spot_img
अहमदनगरवन वनविभागाने "बिबट्या" पकडला! अहमदनगरच्या 'या' भागात अजूनही तीन' बिबटे? नागरिकांमध्ये भीतीचे...

वन वनविभागाने “बिबट्या” पकडला! अहमदनगरच्या ‘या’ भागात अजूनही तीन’ बिबटे? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
म्हसोबा झाप, गुरेवाडी, भोरवाडी कन्हेर या आदिवासी ग्रामीण भागात बिबट्यांचे प्रमाण असून मानवी वस्तीमध्ये बिबटे अनेक वेळा दिसून आले आहेत. पाळीव प्राण्यांवर बिबट्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. म्हसोबा झाप भागात मांडओहळ हे धरण व वनविभागाचे मोठे क्षेत्र असल्याने येथे बिबटे आहेत. बिबट्यांचा मानवी वस्ती कडे वाढलेला वावर लक्षात घेता या भागात बिबट्यांनी अनेक वेळा पाळीव प्राण्यांवरती हल्ले केले आहे. वारंवार घडणाऱ्या या घटना लक्षात घेऊन म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी केलेल्या पाठपुराव्या वन विभागाच्या वतीने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते.

गेल्या आठ दिवसात दोन बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. भोरवाडी येथील भाऊसाहेब हांडे यांच्या शेतामध्ये दोन्हीही बिबटे पिंजरा लावून पकडण्यात आले आहेत. तरीही या भागामध्ये अजून तीन बिबटे आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अजून बिबटे या भागात असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. पाठीमागच्या आठवड्यात भोरवाडी येथील शेतकरी अशोक निकम यांच्या गायीवर हल्ला करत बिबट्याने फडशा पाडला होता. पाळीव कुत्र्यांवरती पण बिबट्याने हल्ला केला आहे. या भागातील शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाने ही त्वरित दखल घेत या भागात पिंजरे लावून आत्तापर्यंत दोन बिबटे जेरबंद केले आहेत अजूनही या भागात बिबट्या असल्याने वनविभाग सतर्क आहे. म्हसोबा झाप परिसरामध्ये जंगल सदृश्य व डोंगराळ भाग असल्याने या भागात अनेक हिंस्र प्राणी सुद्धा आहेत त्यामुळे या भागातील भय कधी संपत नाही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या भागात ग्रामस्थ बाहेर पडण्यास घाबरतात.

वनविभागाची सतर्कता
वनविभागाने सतर्कता दाखवत गेल्या आठवड्यापासून म्हसोबा झाप या भागात दोन बिबटे पकडले आहेत तरी पण या भागात अजून तीन बिबटे असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ मध्ये भीतीचे वातावरण आहे. आदिवासी व डोंगराळ परिसर असल्याने अनेक शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा अवघड वाटेने शाळेत ये-जा करावी लागते हिंस्र प्राणी सुद्धा असल्याने भय इथले संपत नाही अशीच काहीशी परिस्थिती आहे.
-प्रकाश गाजरे (सरपंच, म्हसोबा झाप)

वनविभागाचे कामगिरीचे कौतुक
टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन म्हसोबा झाप परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून पाळत ठेवून पिंजरा लावत भोरवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब हांडे यांच्या शेतामध्ये दोन बिबटे जेरबंद केले आहेत त्यांनी केलेले हे धाडसी कामाचे परिसरातून कौतुक होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुलगी एकटी होती, आईच्या बॉयफ्रेंडन दार बंद केलं अन्..; नगर शहरातील खळबळजनक घटना

अहमदनगर । नगर सहयाद्री:- राज्यात दररोज महिला अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर घटना समोर येत...

मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश! शेतकऱ्यांच्या संघर्षाला शंभर वर्षांनंतर न्याय..

श्रीरामपूर । नगर सहयाद्री:- सुमारे १०० वर्षांपासून प्रलंबित असलेला हरेगाव मळ्यातील जमिनीचा प्रश्न महसूल मंत्री...

‘भाची’ चा बदला घेण्यासाठी ‘मामा’ ने रचला डाव? भाचे जावयासोबत भर रस्त्यात ‘धक्कादायक’ प्रकार…

अहमदनगर । नगर सहयाद्री:- एक वर्षापूर्वी एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेवासा तालुक्यात...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांसाठी आनंदाचा दिवस? तुमच्या नशिबात काय? वाचा..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य...