spot_img
महाराष्ट्रपूजा खेडकरला UPSC चा मोठा झटका; प्रकरणात नवा ट्विस्ट? त्यांनी मला रुममध्ये...

पूजा खेडकरला UPSC चा मोठा झटका; प्रकरणात नवा ट्विस्ट? त्यांनी मला रुममध्ये…

spot_img

IAS Pooja Khedkar News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणात बुधवारी एक नवा ट्विस्ट आला. IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. यावेळी पूजा खेडकर यांचे वकील ॲडव्होकेट माधवन यांनी कोर्टात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला.

ॲडव्होकेट माधवन यांनी सांगितले की, खेडकर यांनी दिवसे यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. त्यांनी दावा केला की दिवसे यांनी खेडकर यांना त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले होते, मात्र खेडकर यांनी त्याला नकार दिला त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सांगण्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.

ॲडव्होकेट माधवन यांनी न्यायालयात भक्कमपणे पूजा खेडकरची बाजू मांडताना अनेक खळबळजनक दावे केले. त्यांनी पूजा खेडकरची बाजू मांडताना म्हटले की, पूजा खेडकर हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आता ते म्हणत आहेत की, माझी पोलीस कोठडीत चौकशी झाली पाहिजे. पण मी काय केलं आहे? सरकारी यंत्रणांनी माझ्यावर गुन्हा दाखल करताना इतकी तत्परता का दाखवली. मला माझ्या बचावाची बाजू मांडण्यासाठी पूर्ण संधी मिळाली पाहिजे, असे पूजा खेडकरने म्हटले.

मात्र, माझ्यावर गुन्हेगारी खटला दाखल केल्याने आणि मला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने मी माझा बचाव करण्यास असमर्थ आहे. त्यासाठी मला अटकपूर्व जामिनाची गरज आहे. मला अटक करण्यास स्थगिती दिल्यास मला बचावाची संधी मिळेल, असे पूजा खेडकरने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले.

खेडकर फ्रॉड नाही तर फायटर
खेडकर यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, खेडकर या फ्रॉड नाहीत तर फायटर आहेत. त्यांनी परीक्षेसाठी संघर्ष केला आहे. त्याचे आईवडील घटस्फोटित आहेत. ती महिला आहे. तिच्यावर गुन्हा का दाखल केला गेला. कारण ती दिव्यांग आहे म्हणून की ती महिला आहे म्हणून?,असे सवाल खेडकर यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर उपस्थित केले.

पूजा खेडकरला मोठा धक्का; IAS पद झाले रद्द
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरला मोठा दणका मिळालाय. पूजा खेडकरचे आयएएस पद तात्पुरतं रद्द करण्यात आले आहे. यूपीएससीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकरची उमेदवारी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे.पूजा खेडकर प्रकरणात यूपीएससीने सर्वात मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांनी दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केले आहे. यूपीएससीने प्रेस नोट जाहीर केली आहे. यामध्ये पूजा खेडकरला २०२२ साली आम्ही दिलेले आयएएस पद तात्पुरतं रद्द करत आहोत असे म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...