spot_img
अहमदनगरभरधाव टँकरची दुचाकीला धडक; ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू, कुठे घडली घटना?

भरधाव टँकरची दुचाकीला धडक; ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू, कुठे घडली घटना?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
जिल्ह्यामधील राहता तालुक्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुधाच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने साकुरी येथील ग्रामपंचायत सदस्य तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.विश्वनाथ प्रकाश बनसोडे असे मयत तरुणांचे नाव आहे. सदरची मंगळवार दि. ३० रोजी पोलीस स्टेशनजवळ भडांगे टी सेंटर समोर घडली.

याप्रकरणी दुध टँकर चालकाविरोधात राहाता पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या अपघातप्रकरणी मृताचे नातेवाईक सचिन योसेफ बनसोडे (रा. साकुरी) यांनी राहाता पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीमध्ये म्हटले, की मंगळवार दि. ३० जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील पोलीस स्टेशनजवळ असलेल्या भडांगे टी सेंटरसमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच १७ के ९०४५ या दुधाच्या टँकरने मोटारसायकलवर चाललेले भाऊ विश्वनाथ प्रकाश बनसोडे यांच्या मोटारसायकलला (क्रमांक एमएच १७ बीए ६८११) मागून जोराची धडक दिली.

यामध्ये मोटारसायकलसह विश्वनाथ खाली पडले. यामध्ये त्यांना जबर मार लागल्याने ते जागेवरच मृत पावले. मोटारसायकल मागच्या चाकाखाली सापडून अपघाताचा मोठा आवाज झाल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली.

विश्वनाथ बनसोडे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर गाडीच्या काही भागाचा चुराडा झाला होता.नागरिकांनी बनसोडे यांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...

इंस्टाग्रामची चॅटींग ११ तोळ्यांला भोवली! मेकॅनिक रेहानने नेमकं काय केलं? अहमदनगर मधील घटना

अहमदनगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार? तुमची रास काय? वाचा..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा...