spot_img
अहमदनगरशरद पवारांनी विधानसभेची फुंकली 'तुतारी'! म्हणाले...

शरद पवारांनी विधानसभेची फुंकली ‘तुतारी’! म्हणाले…

spot_img

अहमदनगर : नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अकोले येथे दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या जयंती सोहळ्यास ते उपस्थित राहिले. यावेळी शरद पवारांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा पार पडला. खासदार निलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा तसेच आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केले. ‘थांबायचं नाही, सत्ता हातात आल्याशिवाय राहत नाही’, नगरच्या सभेतून शरद पवार गरजले; विधानसभेची तुतारी फुंकली!

“लोकसभेने एक नवी दिशा देशाला दाखवली आहे. सत्तर दिवसांनी विधानसभेची निवडणूक आहे. आता तयारीला लागा. तुम्ही सर्व एकत्र असाल तर कुणीही धक्का लावू शकत नाही, सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहत नाही, आता काही मागायचं नाही ठरवलंय. तुम्ही मला अनेकदा निवडून दिलयं, आता फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायच आहे. ते आणण्यासाठी तुमची शक्ती हवीय’ असे म्हणत शरद पवार यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले.

पुढे बोलताना पवार म्हणले “बळीराजासाठी सत्ता वापरणे हे सूत्र राज्यकर्त्यांचे असले पाहिजे. मात्र देश आज वेगळ्या संकटातून जात आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध धांद्याकडे बघितले जाते, मात्र आज त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येते. नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कशाचा विचार न करता कांद्याचे पीक घेतो. त्याला रास्त दर मिळावा एवढीच मागणी असते,”

“मात्र कांद्याला दर मिळत नाही. मोदींच्या नाशिकच्या सभेत एक शेतकरी उठला आणि म्हणला तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय, माझ्या कांद्याला भाव द्या’ पोलिसांनी त्याला पकडलं आणि आत टाकलं. कांद्याला भाव मागण्याचा अधिकार या देशात नाही. हे मोदींच्या राज्यात नाशिकमध्ये समोर आलं,” असा टोला शरद पवार यांनी लगावला.

“आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणी शेतकरी यांची आस्था नाही. आता तुमची आमची जबाबदारी आहे. लोकसभेत तुम्ही उत्तम काम केलंय. पाच वर्षापूर्वी काॅग्रेसला एक आणि राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्या याचा अभिमान आहे,” असेही खा. शरद पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...