अहमदनगर। नगर सहयाद्री
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्यामुळे होणारा उपद्रव सातत्याने वाढत आहे. शहरातील लक्ष्मी कारंजा परिसरात एका कुत्र्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. मुलाला घराकडे येत असताना कुत्रा चावल्याने मुलांच्या कटूंबाने पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्यादी दिली आहे. त्यानुसार कुत्र्याची मालक असणाऱ्या महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश चंद्रकांत सुपेकर ( वय-४४ वर्षे, रा. पुर्णवादी बैंकेमागे, लक्ष्मी कारंजा, अहमदनगर ) त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार इंदुबाई ढवळे ( रा. पुर्णवादी बैंकेमागे, लक्ष्मी कारंजा, अहमदनगर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सर्व प्रकार १२ जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडाला आहे. फिर्यादी कटूंबासह लक्ष्मी कारंजा परिसरात वास्तव्यास आहे. घरा शेजारी वास्तव्यास असणाऱ्या महिलेने तीन पाळीव कुत्रे पाळलेले आहेत. त्यांचे पाळीव कुत्रे जाता- येता नेहमी अंगावर धावुन येवुन भुंकुन पाठलाग करीत असतात. कुत्र्याचा त्रास होत आहे. त्यांना नीट ठेवा असं फिर्यादी यांनी कुत्राच्या मालकाला सांंगितलं होतं.
मात्र मालकांनी त्या कुत्र्याबाबत काहीच अॅक्शन घेतली नाही. दि १२ जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुलगा सार्थक( वय-५ वर्षे) हा हात धुण्यासाठी घराबाहेर गेला असता कुत्राने त्यांच्या चावा घेतला. त्यानंतर फिर्यादी यांनी मुलाला सिव्हील हॉस्पीटल येथे औषधोपचार घेवुन कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.