spot_img
अहमदनगरकसा राहणार पावसाचा जोर? पंजाबराव डख यांचा अंदाज वाचा एका क्लिकवर..

कसा राहणार पावसाचा जोर? पंजाबराव डख यांचा अंदाज वाचा एका क्लिकवर..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
जुलैचा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणार्‍या काही भागांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक जिल्हे मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच, आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात १४ जुलैपासून पावसाचा जोर वाढणार आहे. १४ जुलै ते २० जुलै या सात दिवसांच्या कालावधीत राज्यात चांगला जोरदार पाऊस होण्याची शयता आहे.

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून १४ ते २० जुलै दरम्यान चांगला पाऊस बरसणार आहे. या कालावधीत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागात दमदार पाऊस पडणार आहे. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शयता आहे. अगदी ओढे-नाले भरून वाहतील अशा स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे या काळात छोटे-मोठे तळे देखील फुल भरणार आहेत आणि मोठ्या धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक वाढणार असा विश्वास पंजाबरावांनी व्यक्त केला आहे.

दरवर्षी दहा ते पंधरा जुलै या कालावधीत राज्यात चांगला पाऊस पडत असल्याचे म्हटले आहे. यामुळे यंदाही या काळात चांगला पाऊस पडणार आहे. दरवर्षी दहा ते पंधरा जुलैच्या कालावधीत म्हणजे आषाढी वारीच्या काळात जोरदार पाऊस पडत असतो. यंदाही आषाढी वारीच्या या काळात चांगला पाऊस पडणार आहे. यावर्षी संपूर्ण मान्सून काळात चांगला पाऊस राहील. पावसाचा खंड पडणार नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी बिनधास्त राहावे असे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी म्हटले आहे. तसेच दुसरीकडे हवामान खात्यातील काही तज्ञांनी सुद्धा १४ ते १८ जुलै या कालावधीत महाराष्ट्रात चांगल्या जोरदार पावसाची शयता वर्तवली आहे.

खरिपाची पेरणी १०३ टक्के
जिल्ह्यातील ५ लाख ९६ हजार ६६० हेटर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. जवळपास १०३ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी आजमितीस फक्त १५ टक्के पेरणी झाली होती. यंदा शेतकर्‍यांनी सोयाबीन आणि कापसाला अधिक पसंती दिली. त्यामुळे सोयाबीनची पेरणी १७३ तर कापसाची पेरणी १०७ टक्के पेरणी झाली आहे. बाजरीचा पेरा फक्त ४३ टक्के झाला आहे. यंदा जून महिन्यात सरासरी १७७ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरणीजोगे वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीसाठी धावपळ केली. त्यामुळे दीड महिन्यामध्येच १०३ टक्के पेरणीची नोंद झाली आहे. सोयाबीनसाठी ८७ हजार ३३० हेटर क्षेत्र असताना शेतकर्‍यांनी १ लाख ५१ हजार १९७ हेटर क्षेत्रावर पेरणी केली आहे. कापसासाठी १ लाख २२ हजार ८७ हेटर क्षेत्र निश्चित असताना आतापर्यंत १ लाख ३० हजार हेटर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीचा पेरा फक्त ४३ टक्के असून, मंयाचा पेरा मात्र, ११३ टक्के झाला आहे.

मुंबईला पुराचा धोका
महाराष्ट्रासह मुंबईत पावसाने जोर धरला आहे. सोमवारी मुंबईत काहीच तास झालेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबई व उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. त्यानंतर संपूर्ण आठवडा मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच आहे. शुक्रवारी देखील मुंबईकरांची सकाळी पावसाने दाणादाण उडवली. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवसही मुंबईकरांसाठी धोयाचे ठरु शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांचा विकेंड पावसातच जाणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुंबईत मध्यम आणि मुसळधार पाऊस बरसण्याची शयता आहे. तर, पुढच्या आठवड्यात १७,१८ आणि १९ जुलै रोजी जोरदार पावसामुळं मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पाऊस मुंबईसह ठाण्यात धुमशान घालणार. असा अंदाज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...