spot_img
महाराष्ट्रविधानसभेसाठी महायुतीचं ठरलं; फॉर्म्युला निश्चित, कोण किती जागा लढवणार पहा

विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं; फॉर्म्युला निश्चित, कोण किती जागा लढवणार पहा

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने १७० ते १८० जागा लढण्याची रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत १८० पेक्षा कमी जागा लढवू नये, अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना करण्यात आल्याचे समजते. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युलाही निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार  भाजपने१७०-१८०, शिंदे गटाने सुमारे ७० व उर्वरित ५८ जागा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांना दिल्या जाव्यात, असेही प्रदेश भाजपमधील नेत्यांनी सुचवले असल्याचा दावा सूत्रांनी केला.

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने दबाव आणून जास्त जागा पदरात पाडून घेतल्याची भावना भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आहे. गेल्या काही काळात महायुतीमध्ये शिंदे गटाचा प्रभाव वाढत असल्याची कुजबुजही भाजपच्या वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या दबावाला न जुमानता १७० ते १८० जागा कोणत्याही परिस्थितीत लढायच्याच. जेणेकरुन महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता येईल, असा भाजप नेत्यांचा मनसुबा असल्याचे समजते.

दरम्यान एकीकडे भाजपकडून विधानसभेच्या १८० जागांवर लढण्याची तयारी सुरु असली तरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून यापूर्वीच १०० जागांची मागणी करण्यात आली आहे. महायुती तुटू न देण्यासाठी शिंदे गटाची ही मागणी मान्य करायची झाल्यास भाजप आणि अजितदादा गटासाठी विधानसभेच्या १८८ जागाच उरतील. अशावेळी भाजपच्या वाट्याला १२० ते १३० जागाच येतील. १०० टक्क्यांच्या स्ट्राईक रेटने या सर्व जागा जिंकणे, तसे अवघड आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकहाती बहुमत मिळण्यापासून दूर राहील आणि पुढील पाच वर्षे भाजपला पुन्हा अनेकांची मर्जी सांभाळत सरकार चालवावे लागेल. त्यामुळेच भाजपने १८० पेक्षा कमी जागा लढवू नये, अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना करण्यात आल्याच समजते.

भाजपने २०१९ साली शिवसेनेसोबत विधानसभेची निवडणूक लढली होती. त्यावेळी भाजपने १५२ तर, शिवसेनेने १२४ व इतरांनी १२ जागा लढवल्या होत्या.आता भाजपने एकट्याने १८० जागा लढवल्यास विधानसभेला शिंदे गट आणि अजितदादा गटासाठी फक्त १०८ जागा उरतील. यामध्ये शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या वाट्याला काय येणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जागावाटपाच्या या फॉर्म्युलावर राजी होतील, का याबाबत साशंकताच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर जिल्ह्यातील ‘ते’ धरणं तुडूंब! कुठल्या धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर जिल्ह्यातील शेती, व्यापार, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांना वरदान ठरलेल्या...

विधानसभेला जोरका झटका देणार, महायुतीचे काम नाही करणार?, नगच्या राजकारणात नेमकं शिजतंय काय?, कोणी केलं वक्तव्य..

Politics News: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून येथे आरपीआयला उमेदवारी मिळावी. कारण गेल्या...

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरवणार? ‘या’ तीन नेत्यांना दिले अधिकार

  Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...

‘त्यांच्या’ मेंदूत ५० टक्के शेण! आमदार रोहित पवार यांचा ‘यांनी’ घेतला समाचार

Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...