अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर जिल्ह्यात आषाढ सरींनी सर्वदूर हजेरी लावली. सोमवारी, मंगळवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरीत कमालीची वाढ झाला असून आजमितीला ४८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान हवामान खात्याने पुन्हा पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
जून महिन्यांच्या पहिल्या दिवसापासून यंदा जामखेड, कर्जत, पाथर्डी, पारनेर, नगर, श्रीगोंदे यासह दक्षिण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. तर उत्तरेतील अनेक तालुयात पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम खरीप हंगामाच्या पेरण्यावर होताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या १५ ते २० दिवसांच्या खंडानंतर सोमवारपासून नगर शहर आणि दक्षिण जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंगळवारी हवामान खात्याने पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे.