अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नगर लोकसभा मतदारसंघात निवडणूकीदरम्यान झालेल्या खर्च उमेदवारांनी अहमदनगर जिल्हा प्रशासनला सादर केला आहे. महायुतीचे परभूत उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सर्वाधिक खर्च केल्याचे आकडेवारीवरून दिसते येते. त्यांनी तब्बल ८३ लाख ४५ हजार १२७ रूपयांचा खर्च सादर केला केला आहे. तर महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार नीलेश लंके यांनी तब्बल ६४ लाख ४५ हजार २६८ रूपयांचा खर्च सादर केला आहे. निवडणूकीतील खर्चाची मर्यादा ९५ लाख रूपयांची मर्यादा दिली होती. दरम्यान खर्चावर निवडणूक निरीक्षक शक्तीसिंग तसेच जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी निवडणूक विभागाला खर्च सादर केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमदेवार दिलीप खेडकर यांनी सुमारे १२ लाख ७४ हजार ५२४ रूपयांचा खर्च दाखवला आहे. तर अन्य २५ उमेदवारांनी देखील खर्च सादर केला आहे. खर्चाच्या पडताळणीसाठी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा अधिकारी शैलेश मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक तयार करण्यात आले होते. या पथकाकडे उमेदवारांनी खर्च सादर केला होता. निवडणूक विभागाने ताळमेळ घालत खर्च ठरवाला गेला.
दरम्यान निवडणूकीच्या निकालानंतर ३० दिवसांत खर्च सादर करण्याची मुदत दिली होती. त्या आगोदर उमेदवारांनी निवडणूकीत झालेला खर्च प्रशासनाला सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सावेडी उपनगरात झाली होती. शहर झालेल्या सभेचा खर्च ३९ लाख रूपये दाखविण्यात आला आहे. हा खर्च नगरचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील व शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये विभागून दाखवण्यात आला आहे.