spot_img
अहमदनगरखा. निलेश लंके आक्रमक; प्रशासनावर केला गंभीर आरोप, दुसऱ्या दिवशी काय काय...

खा. निलेश लंके आक्रमक; प्रशासनावर केला गंभीर आरोप, दुसऱ्या दिवशी काय काय घडलं पहा…

spot_img

कांदा, दूध प्रश्नांवरील ठिय्या आंदोलन जनावरांसह दुसर्‍या दिवशी सुरूच | महिलांनी मांडल्या चुली
अहमदनगर | नगर सह्याद्री
कांद्याला हमीभाव आणि दुधाला ४५ रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दुसर्‍या दिवशी आंदोलनामध्ये शेतकर्‍यांनी शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी आणत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बांधली. आंदोलनामध्ये महिलांनीही सहभाग घेत आंदोलनस्थळीच स्वयंपाक बनवला. तर दुसरीकडे टाळ, मृदृंग वाजवत भजन किर्तन सुरु होते.  

दूध तसेच कांद्याच्या दरासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चास मोठा प्रतिसाद मिळाला. दुसर्‍या दिवशीही शेतकर्‍यांनी जनावरांसह आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला.  दरम्यान, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने खा. लंके यांनी शेतकर्‍यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या दिला आहे. दरम्यान खा. लंके यांच्याशी चर्चा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील हे आंदोलनस्थळी आले होते. मात्र हे प्रश्न शेतकर्‍यांच्या संबंधित व गांभीर्याचे असल्याने चर्चेसाठी जिल्हाधिकार्‍यांनीच यावे या भूमिकेवर लंके ठाम राहिले. लंके म्हणाले, आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन केले आहे. सरकारने दखल घेतली नाही तर राज्याच्या राजधानीमध्ये महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल. त्या आंदोलनात मुकी जनावरेही आणली जातील. आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच ठिकाणी जनावरांची छावणी सुरू करून बसणार असल्याचा इशारा त्यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार शनिवारीही शेतकरी जनावरांसह आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनामध्ये खासदार नीलेश लंके, राणी लंके, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, अभिषेक कळमकर, किरण काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने भाजल्या भाकरी, हाटलं पिठलं
महाविकास आघाडी सरकाच्यावतीने खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या शेतकरी आंदोलनाच्या दुसर्‍या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मुया जनावरांची संख्या वाढली. तसेच शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. आंदोलनात खासदार निलेश लंके जमिनीवर बसून आंदोलन केले. जन आक्रोश आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी कीर्तन पार पडले. आणि त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला. शेतकर्‍यांचे भाषण देखील या ठिकाणी सुरू आहेत. याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडत जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने भाकरी भाजल्या. खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यादेखील महिलांसोबत जेवण बनवल, त्यांनी या ठिकाणी चुलीवर भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकर्‍यांच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही पुकारले आहे. आम्ही सर्व महिला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहोत, म्हणून आज आम्ही महिलांनी चुली पेटल्या आहेत. आमच्या उपस्थितीत शेतकर्‍यांना, आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही याच ठिकाणी जेवण बनवून घालणार आहोत. शेतकर्‍यांच्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी मान्य व्हाव्यात अन्यथा हे आंदोलन रान पेटवेल असा इशारा देण्यात आला.

प्रशासनावर कोणाचा तरी दबाव : खा. नीलेश लंके यांचा गंभीर आरोप
शेतकर्‍यांसाठी आम्ही आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनावर कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला आहे. नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गावागावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहे.  आज मोठ्या संख्याने गोवंशीय जनावरे देखील या आंदोलनात आणले आहेत. शेतकर्‍यांना न्याय मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. सरकारने चार महिन्यापूर्वी अनुदान जाहीर केले. त्यातील दोन टक्के लोकांना तरी पैसे मिळाले का? असा सवाल खा. लंके यांनी यावेळी उपस्थित केला. कागदपत्रांच्या नावाखाली शेतकर्‍यांची पिळवणूक होत असल्याचा आरोपही यावेळी केला. आम्हाला आमच्या हक्काचा दर मिळाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. प्रशासनावर कोणाचा तरी दाबाव आहे. ते कसा काय या आंदोलनाकडे येतील. जिल्हाधिकारी मोठे साहेब आहेत. त्यांनी आलचं पाहिजे अशी आमची मागणी नाही. त्यांनी आलच पाहिजे यांच्याशी काही देणे घेणे नाही. मी काय ग्रामपंचायत सदस्य नाही. मी २१ लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत आहे. मात्र त्यांच्यावर कोणांचा तरी दबाव असेल. दबाव कोणांचा आहे हे सर्वांना माहिती आहे. आम्ही आता पाल ठोकून राहणार आहे. उद्या जिल्हाभरातील शेतकरी या आंदोलनात येतील असेही खासदार लंके यांनी म्हटले आहे.

आऊटपुट घेऊनच जाणार
आमच्या आंदोलनाकडे जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. आम्हाला हात जोडता येतात आणि बाह्या देखील वर करता येतात. शेवटी आमचे नाते शेतकरी, सर्वसामान्य जनतेशी आहे. आम्ही जिल्हाधिकार्‍यांच्या दारात आलो आहोत, येथून आऊटपुट घेऊनच जाणार असल्याचा निर्धार खा. नीलेश लंके यांनी केला.  

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...