जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांना निवेदन
पारनेर / नगर सह्याद्री –
अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या टाकळी ढोकेश्वर येथील श्री. ढोकेश्वर विद्यालयातील शिक्षक राहुल झावरे व अमोल ठाणगे या शिक्षकांची करण्यात आलेली बदली थांबवावी म्हणून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी थेट अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना निवेदन दिले आहे.
निवेदनामध्ये असे म्हटले आहे की आम्ही सर्व विद्यार्थी श्री. ढोकेश्वर विद्यालयातील विद्यार्थी असून इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत आहोत. आम्हाला शिकवणारे शिक्षक राहुल भगवंत झावरे विषय विज्ञान व अमोल धोंडीभाऊ ठाणगे विषय सामाजिक शास्त्र हे अतिशय चांगले शिकवीत आहेत. तरी त्यांच्या विषयी आमचे कोणतेही विद्यार्थ्यांचे काहीही तक्रार नाही तरी काल अचानक त्यांची बदली झाली असल्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. दहावीचे वर्ष आमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे आहे.
गेल्यावर्षी आम्ही नववीला असताना हिंदी विषयाला पण वर्षभर शिक्षक नव्हते आम्ही गरीब विद्यार्थी असल्याने खाजगी शाळेत शिकण्याची परिस्थिती नाही. तरी श्री राहुल झावरे सर व अमोल ठाणगे सर यांची अति तातडीने टाकळी ढोकेश्वर येथे बदली करण्यात यावी अन्यथा आम्ही विद्यार्थी शाळा शिकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही तरी साहेब आपण आमच्या गरीब विद्यार्थ्यांचा विचार करावा ही विनंती तरी दोन दिवसात बदली न झाल्यास आम्ही सर्व विद्यार्थी शालेय शिक्षण मंत्री यांना भेट घेऊन निवेदन देणार आहोत त्याच बरोबर ग्रामपंचायत टाकळी ढोकेश्वर यांचा ग्रामसभेचा दिनांक ६ जुलै २०२४ रोजीचा ठराव घेतला आहे तरी या सर्व प्रकाराचा साहेब आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा. आशा आशयाचे निवेदन टाकळी ढोकेश्वर येथील श्री. ढोकेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिव तसेच नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांना दिले आहे.
विद्यार्थ्यांना तोपर्यंत शाळेत पाठवणार नाही
विद्यालयात हिंदी विषयाचे शिक्षक नव्हते तरी विद्यार्थ्यांची तक्रार नव्हती परंतु काही आता कारण नसताना विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयाचे शिक्षकांची अचानक बदली करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता खराब झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याची इच्छा नाही मी आता विद्यार्थ्यांना जोपर्यंत शिक्षक शाळेत येत नाहीत तोपर्यंत पाठवणार नाही असे विद्यार्थ्यांचे पालक दत्तात्रय निवडूंगे व सुनील माकरे यांनी सांगितले.