spot_img
अहमदनगरसराईत गुन्हेगार 'डिस्चार्ज' अडकला जाळ्यात! कुलत्या, दऱ्या, आजब्या देखील 'गजाआड'; स्थानिक गुन्हे...

सराईत गुन्हेगार ‘डिस्चार्ज’ अडकला जाळ्यात! कुलत्या, दऱ्या, आजब्या देखील ‘गजाआड’; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई पहा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामधील बेलापुर पढेगांव रस्त्यावरील काळभैरवनाथ मंदीराच्या रोडलगत अंधारात दबा धरून बसलेले दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

स्वरुप ऊर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे, दऱ्या बरांड्या भोसले, आजब्या महादु भोसले, कुलत्या बंडु भोसले, सर्व (रा. अंतापुर, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांचेकडे पळुन गेलेल्या संशयीतांचे नाव विचारले असता रवि ऊर्फ रविंद्र मुबारक भोसले, सोहेल पठाण दोन्ही ( रा. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर ) असे सांगितले.

त्यांच्याकडून ७० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची बोरमाळ, ७० हजार रुपये किंमतीचे लॉकेट, ४२ हजार रुपये किंमतीची सहा ग्रॅम वजनाची नथ, ३५ हजार रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची अंगठी, १ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, २ हजार रुपये किंमतीची १ तलवार, २ हजार रुपयांची एअर पिस्टल, १ कटावणी, 1 रामपुरी चाकु, मिरचीपुड असा एकुण ४ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी नेवासा व श्रीरामपूर शहर परिसरात गुन्हे केले असल्याची कबुली दिली.

आरोपी नामे कुलत्या बंडु भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण १५ गुन्हे दाखल आहेत. स्वरुप ऊर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे त्याचे विरुध्द देखील गंभीर स्वरुपाचे एकुण 15 गुन्हे दाखल आहे. द-या बरांड्या भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द दरोड्याचे 3 गुन्हे दाखल आहेत.आजब्या महादु भोसले त्याचे विरुध्द देखील दरोडा तयारी व फसवणुक असे गंभीर स्वरुपाचे एकुण 3 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यामार्गदर्शनाखाली पोउपनि/सोपान गोरे व अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, पंकज व्यवहारे, विशाल दळवी, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, संदीप चव्हाण, संदीप दरंदले, संतोष खैरे, फुरकान शेख, अमृत आढाव, रविंद्र घुंगासे, विशाल तनपुरे, मच्छिंद्र बर्डे, जालिंदर माने, मयुर गायकवाड, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, अरुण मोरे, मोहम्मद शेख यांच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...