spot_img
अहमदनगरपारनेर तालुक्यात रेशन घोटाळा! तक्रारदाराचे पोलीस अधीक्षकांना साकडे, वाचा सविस्तर

पारनेर तालुक्यात रेशन घोटाळा! तक्रारदाराचे पोलीस अधीक्षकांना साकडे, वाचा सविस्तर

spot_img

शरद रसाळ | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपुर येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या अपहाराबाबत पुरवठा निरीक्षकांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोन वर्षे उलटली तरी या गुन्हयासंदर्भातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखलच करण्यात आले नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

म्हसणे सुलतानपुर येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या वितरणात अपहार झाल्याची तक्रार शंकर रेवजी तांबे यांनी केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तांबे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने या अपहाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षक विवेक विनोद वैराळकर यांनी १७ मार्च २०२२ रोजी सुपा पोलीस ठाण्यात जनसेवा स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षांविरोधात फसवणूक, अत्यावष्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती.

फिर्याद दाखल होऊन दोन वर्षे उलटूनही न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न झाल्यान तक्रारदार शंकर रेवजी तांबे यांनी पोलीस अधिक्षकांकडे त्याबाबत तक्रार दाखल केली. फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतर वेळोवेळी तपासी अधिकारी बदलण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. तपास अधिकारी ओव्हळ, टी.आर.पवार तसेच एम.एच.जोजाट यांच्याकडे तपास वेळोवेळी वर्ग झाला असल्याची माहिती समोर आली असून साक्षीदारांची संख्या जास्त असल्यामुळे संबंधित कागदपत्रे प्राप्त होण्यासाठी विलंब लागत आहे.

तहसिलदार पारनेर यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे असे सांगून वेळ मारून नेण्यात येते आहे. तसेच बचत गटाच्या अध्यक्षा मिराबाई रामचंद्र पठारे यांच्याविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला असून सेल्समन, पुरवठा अधिकारी तसेच सचिव यांना अभय देण्यात आल्याचे तक्रारदारा तांबे यांचे म्हणणे असून दोषारोप पत्र दाखल करणेकामी होत असलेल्या विलंबाची चौकशी करून लवकरात लवकर दोषारोप पत्र दाखल करण्यात यावे अन्यथा औरंगाबाद खंडपीठाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्याचा इशारा तांबे यांनी दिला आहे.

तक्रारदाराला समजपत्र!
तक्रारदार शंकर रेवजी तांबे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर दोन वर्षे विलंब होऊनही साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासाठी वेळ लागला आहे. गुन्हयाचा तपास सुरू असून त्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करण्यात आलेली नाही अथवा कोणावरही अन्याय करण्यात आलेला नाही. दोषारोप दाखल करण्याइतपत भक्कम पुरावा प्राप्त करून लवकरात लवकर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्याची तजवीज ठेवली असल्याचे समजपत्र विद्यमान तपासी अधिकारी एम.एच. जोजाट यांनी तक्रारदार तांबे यांना देत त्यांचा अर्ज दप्तरी फाईल करण्यात आल्याचे समजपत्रात नमुद करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...