spot_img
अहमदनगर'I Nilesh Dyandev Lanke...' खासदार लंके यांनी घेतली इंग्रजीत शपथ, पहा व्हिडीओ..

‘I Nilesh Dyandev Lanke…’ खासदार लंके यांनी घेतली इंग्रजीत शपथ, पहा व्हिडीओ..

spot_img

‘यह तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या? असाच सूर व सुजय विखे यांना टोला
अहमदनगर। नगर सहयाद्री:-
‘संसदेत जाणार्‍याला इंग्रजी भाषा आली पाहिजे’ अशी निवडणूकपूर्व काळात राष्ट्रवादीचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नीलेश लंके यांची तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे यांनी हेटाळणी केली होती. ती हेटाळणी ध्यानात तसेच ठेवलेल्या व निवडून आल्यानंतर मंगळवारी संसदेत खासदारकीची शपथ घेताना नीलेश लंके यांनी सव्याज फेडली. लंके यांनी खासदारकीची चक्क इंग्रजीतून शपथ घेतली.

आपल्या साध्या राहणीने आणि लोकांच्या कामांनी गेल्या पाच वर्षांपासून नीलेश लंके सतत चर्चेत आहेत. निवडणूकपूर्व काळात उमेदवारी घोषित झाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी लंके यांच्या इंग्रजीबाबत शंका उपस्थित केली होती. ‘आपण उच्च विद्याविभूषित आहोत, लंके काय? असाचा विखे यांचा एकूण सूर होता. पण संसदेत शपथविधीच्या वेळी लंके यांनी ‘मराठी’च्या सतारीतून इंग्रजीचे स्वर काढले आणि अनेकांच्या त्यांच्याविषयी पसरलेल्या शंकाकुशंकांना केराची टोपली मिळाली. लंके यांनी इंग्रजी भाषेतून खासदारकीची शपथ घेऊन ‘हम भी कुछ कम नही’ हेच दाखवून दिले. शेवटी कुणाला कोणती भाषा येते हे महत्त्वाचे नसून तो काम काय करतो आणि कसे करतो हे महत्त्वाचे आहे. आपल्या खासदारकीच्या पाच वर्षांच्या काळात ते लोकांची, मतदारसंघातील कामे किती आणि कशी करतात याला महत्त्व प्राप्त होणार आहे.

कामांनी मी साधा जरी असलो तरी मला काय इंग्रजी येते अशी माझी निवडणूकपूर्व काळात हेटाळणी करणार्‍या माजी खासदार डॉ. सुजय विखे यांना त्यांनी इंग्रजीतून शपथ घेऊन टोला मारला. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून टिंगल करणार्‍यांना चपराक देत व महाराष्ट्राची अस्मिता जतन करत, राम कृष्ण हरी म्हणत आदिमाया आदिशक्तीला स्मरून लोकनेते डॉ. नीलेश लंके यांनी संविधानिक लोकप्रतिनिधी म्हणून दिल्ली येथे देशाच्या सर्वोच्च अशा संसदेत इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतली. त्यांचा हा पवित्रा पाहून नगर दक्षिणमध्ये लंके समर्थकांनी जल्लोष करत फटायांची आतषबाजी केली, दिवाळी साजरी केली. लंके यांनी खासदारपदाची शपथ घेताच पारनेर येथील खासदार लोकनेते डॉ. नीलेश लंके साहेब जनसंपर्क कार्यालय येथे युवा नेते दीपक लंके, पारनेरचे नगरसेवक व सहकारी मित्रांनी फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा केला.

खासदार लंके यांनी आयुष्याच्या प्रत्येक राजकीय व सामाजिक टप्प्यावर संघर्षमय मार्गक्रमणा करत असताना गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांच्या आशीर्वादाची शिदोरी बरोबर ठेवली. ग्रामपंचायत सदस्य ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीत यशस्वी पदाधिकारी बनत त्या पदाला न्याय देत खासदार पदापर्यंत पोहोचले. पारनेर नगर मतदार संघाचा संघर्ष योद्धा व नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेला मास्तरचा चिरंजीव आज खासदार झाला! हे सर्वसामान्य जनतेला पडलेले गोड स्वप्न आज सत्यात उतरले. निवडणुकीचा निकाल जरी ०४ जूनला लागला आसला तरी खर्‍या अर्थाने लंके समर्थकांनी शपथविधी पार पडल्यानंतर साजरा केला विजयी जल्लोष.

नगर शहरातही जल्लोष; फटाक्यांची आतषबाजी
नगर दक्षिणमधून नवनिर्वाचीत खासदार नीलेश लंके हे संसदेत खासदार पदाची शपथ इंग्रजीमध्ये घेतली तेव्हा अहमदनगर शहरातील बुरूडगाव रोड येथील खासदार नीलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांच्या वतीने लाइव्ह स्क्रीन लावून शपथविधी पाहिला. शपथविधी झाल्यानंतर फटायांची आतषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, अमोल कांबळे, प्रवीण वारुळे, गणेश रोडे, सचिन कराळे, सागर जपकर, शिवाजी कराळे, संचित निकम, रवी धनवटे, सौरभ सुंबे, सुरेश कसाब, अक्षय शिंदे, गणेश तोडमल नीलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारखान्याबद्दल कर्डिलेंचे प्रेम पुतणा मावशीचे- चाचा तनपुरे

राहुरी | नगर सह्याद्री मला आमदार करा, तनपुरे कारखाना सुरू करतो हे सांगणारे शिवाजी कर्डिले...

नगरमधून पाचपुतेंना मिळणार जास्त मताधिक्य

श्रीगोंदा | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्यातील गावांमधून मिळणार्‍या मताधिक्यापेक्षा नगर तालुक्यातील गावांमधून विक्रमसिंह पाचपुते...

नगरमध्ये सक्रिय झाला मालेगाव पॅटर्न!; हिरवा गुलाल कुणाच्या अंगावर?

खा. निलेश लंकेच्या विजयात किंगमेकर ठरलेल्या मुस्लिम मतांची एकगठ्ठा साथ कोणाला मिळणार? / निलेश...

धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; परिसरात एकच खळबळ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था पश्चिम बंगालच्या मथुरापूर जिल्ह्यात भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात...