अहमदनगर । नगर सहयाद्री-
राजाराणीचा सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडल्याची धक्कादायक घटना नगर-सोलापूर महामार्गावर घडली भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने समोर चालेल्या मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत पतीपत्नीचा मृत्यू झाला आहे. हरिभाऊ राजाराम गरड, सुशीला गरड असे या घटनेत मृत झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
गरड दाम्पत्य नगर-सोलापूर महामार्गाने मिरजगाववरून निमगाव डाकूकडे घरी जात होते. रात्री ९ वाजेच्या दरम्यान बाभळगाव खालसा शिवारात पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने जोरदार दुचाकीला (क्रमांक एमएच २३-वपी २५२) धडक दिली.
त्यात दुचाकीवरील हरिभाऊ राजाराम गरड (रा. निमगाव डाकू, ता. कर्जत), पत्नी सुशीला गरड यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.