Ladli Bahan Yojana : केंद्र सरकार तसेच विविध राज्यातील सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरीबांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा उद्देश असतो.
दरम्यान, महिलांच्या उन्नतीसाठी विविध राज्य सरकारे चांगल्या योजना राबवत आहेत. यातीलच एक योजना म्हणजे ‘लाडली बहना योजनाही योजना मध्य प्रदेश सरकार चालवते. आता याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील गोरगरीब, निम्न, मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशानं एक योजना आखत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी जर ही योजना सुरु केली तर याचा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यात आठ हजार रुपये जमा होतील, असे आश्वासन दिले होते. उत्तर प्रदेशसह काही राज्यात या घोषणेचा काँग्रेसला फायदा झाला. त्यामुळं याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे सरकार देखील अशी योजना आखण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.