बीड। नगर सहयाद्री-
बीड लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणे यांच्या लढतीत सोनावणे यांनी ६ हजारांहून अधिक मताधिक्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. तरीही भाजप नेत्या पंकजा मुंडे खासदार बनणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक त्यांच्या पराभवामुळे निराश झाले आहे. काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल देखील उचललं. त्यातच पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना केली असूनतसा प्रस्ताव देखील महाराष्ट्र भाजपने केंद्रीय नेतृत्वाला पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.