spot_img
आर्थिकBusiness Tricks: आईस्क्रीम व्यवसाय फायदेशीर आहे का? पहा निर्मितीसह यशस्वी व्यवसायाची माहिती,...

Business Tricks: आईस्क्रीम व्यवसाय फायदेशीर आहे का? पहा निर्मितीसह यशस्वी व्यवसायाची माहिती, एका क्लिकवर..

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम –
उन्हाळ्याच्या हंगामात जिथे हे नाव ऐकून लोकांच्या तोंडाला पाणी सुटते ती म्हणजे ‘आईस्क्रीम’ ती कशी बनवली जाते, कोणत्या मशीनची गरज आहे आणि हा व्यवसाय फायदेशीर आहे का? जर तुम्हाला आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्यामुळे आईस्क्रीम व्यवसाय यशस्वी होण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही.

सुरू करा तुमचा स्वतःचा आईस्क्रीम व्यवसाय
आईस्क्रीमचा व्यवसाय दोन प्रकारे केला जातो. पहिला मार्ग म्हणजे मोठ्या ब्रँडचे आइस्क्रीम विकणारे पार्लर उघडणे, जिथे तुम्हाला मार्जिनमधून उत्पन्न मिळते. दुसरा मार्ग म्हणजे तुमचा स्वतःचा आइस्क्रीम ब्रँड तयार करणे. यामध्ये तुम्ही तुमच्या फ्लेवर्सला वेगळेपण देऊ शकता आणि तुमच्या आवडीनुसार मार्जिनही ठरवू शकता. भारतातील प्रसिद्ध आइस्क्रीम ब्रँड नॅचरल्सचीही अशीच सुरुवात मुंबईतील जुहू येथून झाली.

व्यवसाय सुरु करण्यासाठी कुठल्या साधनांची आवश्यकता
आइस्क्रीम व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुमच्याकडे ब्लेंडर किंवा आइस्क्रीम मेकर असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्याकडे डीप फ्रीझर, रेफ्रिजरेटर, स्टोरेज स्पेस, पॅकेजिंग मटेरियल, डिस्पोजेबल कटलरी, जनरेटर आणि बिलिंग सिस्टीम असावी. याशिवाय, तुम्हाला आईस्क्रीम व्यवसाय चालवण्यासाठी सुरुवातीला 5 लोकांपासून काम करावे लागेल. दोन कर्मचारी कुशल कामगार देखील असतील, जे मशीन चालवण्याचे आणि मिश्रण तयार करण्याचे काम करू शकतील.

किती मोठे आहे मार्केट आणि किती असेल कमाई ?
एका अभ्यासानुसार, 2026 पर्यंत भारतातील आईस्क्रीमच्या बाजारपेठेचा आकार सुमारे 44000 कोटी रुपये असेल. फक्त 5 ते 10 लाख रुपये खर्च करून तुम्ही हा व्यवसाय अगदी छोट्या स्तरावर सुरू करू शकता. तुम्ही तो नंतर वाढवू शकता. सुरुवातीला, या व्यवसायातून दरमहा 60,000 रुपयांपर्यंत नफा होतो, जो नंतर तुमच्या स्केलनुसार वाढतो.

आईस्क्रीमची निर्मिती प्रक्रिया पुढील प्रमाणे

साहित्य निवड
आईस्क्रीम तयार करण्यासाठी दूध, साखर, क्रीम, अंडी (ऑप्शनल), आणि फ्लेवर्स (चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, इ.) लागतात.

मिश्रण तयार करणे
दूध, साखर, आणि क्रीम एका मोठ्या भांड्यात मिसळून उकळवतात. जर रेसिपीमध्ये अंडी वापरली जात असतील तर, अंड्याचे पिवळे भाग मिसळून एकसंध मिश्रण तयार करतात आणि त्यात दूध-क्रीम मिश्रण हळूहळू घालून ते उकळतात.

पेस्चरायझेशन
मिश्रणाला ८५°C (१८५°F) वर २५ सेकंद ठेवून पेस्चराइज केले जाते, जेणेकरून त्यातील जीवाणू नष्ट होतील.

होमोजेनायझेशन
मिश्रण होमोजेनाईझरमध्ये ठेवून एकसंध करतात, ज्यामुळे फॅट कणांचा आकार कमी होतो आणि मिश्रण मऊ बनते.

थंड करणे
मिश्रणाला त्वरित ५°C (४१°F) पर्यंत थंड केले जाते आणि काही तास ठेवल्या जाते. यामुळे मिश्रण अधिक चांगले मुरते.

फ्लेवर्स आणि एअर मिसळणे
थंड मिश्रणात आवश्यक फ्लेवर्स आणि रंग मिसळतात. मिश्रणाला फ्रीजरमध्ये ठेवून चर्निंग करतात. चर्निंग प्रक्रियेमुळे मिश्रणात एअर येते, ज्यामुळे आईस्क्रीम मऊ आणि हलकी बनते.

फ्रीजिंग आणि पॅकिंग
चर्निंग झालेलं आईस्क्रीम -२५°C (-१३°F) वर फ्रीजिंग केलं जातं. यामुळे ते सेट होतं. त्यानंतर तयार आईस्क्रीमला पॅक करून -१८°C (०°F) वर स्टोरेज केलं जातं

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...