अहमदनगर। नगर सहयाद्री
एमआयडीसी परिसरातील नवनागापूर खून प्रकरणातील फरार आरोपींला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने जेरबंद केले. किरण बाळासाहेब गव्हाणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. ही कारवाई शनिशिंगणापुर परिसरात करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
नवनागापूर येथे फोनवर व्हिडीओ कॉल करून बोलत असतांना संग्राम कदम व त्यांचे इतर ४ साथीदार तेथे आले होते. त्यावेळी आविनाश मिरपागार हा व्हिडीओ काढत असतांना त्याला शिवीगाळ करत मारहाण करत त्यांच्या डोक्यात सिमेंटचे ब्लॉक डोक्यात टाकत मारहाण केली. डोक्यात सिमेंटचा ब्लॉक डोक्यात टाकून त्याला जीवे ठार मारले.
या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील फारार आरोपी हा नवनागापूर परिसरात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक आहेर यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा लावत सदर आरोपींला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहे.