spot_img
अहमदनगरआर्थिक घडी बसणार? 'या' भागातील शेतकर्‍यांनी उचलले योग्य पाऊल,'अशी' केली पेरणीला सुरवात,...

आर्थिक घडी बसणार? ‘या’ भागातील शेतकर्‍यांनी उचलले योग्य पाऊल,’अशी’ केली पेरणीला सुरवात, पहा..

spot_img

सुपा | नगर सह्याद्री:-
पारनेर तालुयातील काही भागात पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. तर काही भागात पाऊसाने अद्याप उघडीप न दिल्याने पेरण्या रखडल्या आहेत. चालू वर्षी रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर जुन महिन्यात शनिवार (दि.८) व रविवारी (दि.९) पावसाने जोरदार हजेरी लावली. बर्‍याच वर्षांनंतर वेळेत झालेल्या पावसाने शेतकर्‍यांचा आनंद द्विगुणित झाला. पहिल्याच पावसात ओढे नाले केटिवेअर दुथडी भरून वाहू लागले. या आशेवर शेतकर्‍यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली.

खरीप हंगामातील मुग व बाजरी बियाणे बाजारभाव वाढल्याने मुग २०० ते २५० रुपये प्रतिकिलो तर बाजरी ५०० ते ७.५० रुपये प्रतिकिलो तर वाटाणा ७ ते ७.५ हजार प्रति ४० किलो प्रति बॅग, कांदा २ हजार ते २५०० रूपये किलोने खरेदी करावे लागत आहे. हे महागडे बियाणे खरेदी करून शेतात वापसा होताच खरीप हंगामाची पेरणी केली जात आहे.

ली दोन वर्षे खरीप हंगाम वाया गेल्याने बीयाण्यांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान कमी कष्टात व नगदी पीक म्हणून मुग या पिकाकडे पाहीले जाते. या वर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक घडी बसणार असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. सुपा जिरायती पट्ट्यात संपूर्ण शेती ही निसर्गावर अवलंबून आहे.

बर्‍याच वर्षाच्या कालखंडानंतर सुपा, हंगा, मुंगशी, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी, पळवे, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण, पाडळी रांजणगाव, कडूस, भोयरे गांगर्डा, बाबुर्डी, आपधूप, रूईछत्रपती, वाळवणे, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, रायतळे, अस्तगाव आदी ठिकाणी पेरणी योग्य पाऊल झाल्याने खरीप हंगामातील मुग, बाजरी, वाटाणा, तुर, जनावरांसाठी, मका, कडवळ, घास आदींची पेरणी व सोगणीला वेग आला आहे. तर हंगा नदी दुथडी भरून वाहिल्याने तसेच ओढे नाले केटिवेअर पाण्याने तुडुंब भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...

इंस्टाग्रामची चॅटींग ११ तोळ्यांला भोवली! मेकॅनिक रेहानने नेमकं काय केलं? अहमदनगर मधील घटना

अहमदनगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार? तुमची रास काय? वाचा..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा...