spot_img
ब्रेकिंगमहायुतीत पडली वादाची ठिणगी! लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? पहा..

महायुतीत पडली वादाची ठिणगी! लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? पहा..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपयशाला सामोरे जावे लागले. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा स्विकार करावा लागला. त्यातच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी तब्बल १ लाख मताधिक्यांनी पराभव केला. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या विरोधात कामे केल्याचा आरोप आता भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात पहिली वादाची ठिणगी पडली आहे.

अब्दुल सत्तार यांनी पक्षाविरोधात काम केले. त्यांनी निवडणुकीत युतीधर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे सिल्लोड तालुका शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केली आहे. यासंदर्भात कटारिया यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देखील लिहलं आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?
नुकत्याच देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्यात त्यात आपल्या पक्षाची सत्ता आली आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्या वेळेस देशाच्या पंतप्रधानपदी विराजित झाले. त्यांच्या विजयात बाम्हाला अपेक्षित वाटा उचलता आला नाही याची सल मनात आहे. कारण आमच्या लोकसभा मतदारसंघात आम्हाला अपेक्षित मत मिळवून देता आली नाही”, असं कटारिया यांनी म्हटलं आहे.

एकगठ्ठा मुस्लिम मते, आरक्षणाच्या विषयावरून नाराजी या सोबतच सिल्लोड विधानसभा मतदार संघात एक अजून कारण म्हणजे महायुतीचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधात केलेले काम. निवडणुकीच्या काळात दोन अगोदर पासून अब्दुल सत्तार व त्यांचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी काँग्रेस उमेदवाराचे उघड-उघड काम केले”, असा आरोप कटारिया यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...