spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: खळबळजनक! सह्याद्री चौकात आढळला 'स्टीफन' चा मृतदेह, ४ जून रोजी...

Ahmednagar Crime: खळबळजनक! सह्याद्री चौकात आढळला ‘स्टीफन’ चा मृतदेह, ४ जून रोजी चार जणांमध्ये नेमकं घडलं काय? पहा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
नवनागापूर परिसरातील सह्याद्री चौकात ४ जून रोजी एका तरुणांचा मृतदेह बेवारस अवस्थते मिळून आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांना घातपात असल्याचा संशय होता. त्यानंतर दरम्यान सदरचा तरुण स्टीफन अविनाश मिरपगार (वय ३३ रा. आंधळे चीरनगर, नवनागापूर) असल्याचे समोर आले.

एमआयडीसी पोलिसांनी तपासादरम्यान घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तबातमीदार यांच्याकडे चौकशी केली असता स्टीफनचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. ४ जून रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास सह्याद्री चौकात एका पान टपरी जवळ स्टीफन त्याच्या पत्नीसोबत व्हिडीओ कॉलवरून बोलत असताना संशयित आरोपींना तो आपली शुटींग काढत असल्याचा संशयातून त्यांनी सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून स्टीफनची हत्या केली.

याप्रकरणी स्टीफन मिरपगार यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी संग्राम सोन्याबापू कदम (वय १९ रा. तलाठी कार्यालयाजवळ, नागापूर) याला अटक केली असून किरण बाळासाहेब गव्हाणे व सोन्या उर्फ गौतम भगवान अंभोरे (दोघे रा. शनिशिंगणापूर ता. नेवासा) हे दोघे पसार झाले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...