spot_img
देशआरएसएसचा नवा प्लॅन...; अब की बार गडकरी सरकार?

आरएसएसचा नवा प्लॅन…; अब की बार गडकरी सरकार?

spot_img

नागपूर | वृत्तसंस्था
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल १ लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. यानंतर आता संघ वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. संघ पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी नाही तर नितीन गडकरींना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपची धडपड सुरू असतानाच नितीन गडकरी पंतप्रधान होणार असल्याची शयता वर्तवली जात आहे. गडकरींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. योगायोगाने त्यांच्या लोकसभा मतदारसंघात आरएसएसचे मुख्यालयही आहे. यावर्षी गडकरी नव्या संकल्पासह प्रचारात उतरले होते. नितीन गडकरी हे भाजपचे एक असे नेते आहे ज्यांना नावाला काही विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो. शिवसेना उबाठाही नितीन गडकरींच्या नावाला पाठिंबा देण्याची शयता आहे. महाराष्ट्राचा पंतप्रधान या अटीवर शिवसेना उबाठा पक्ष पुन्हा एनडीएसोबत येऊ शकतो. यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या एकूण रणनितीला छेद देता येईल. निवडणुकीनंतर, संजय राऊत यांनी गडकरींवरुन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. फडणवीसांना नितीन गडकरींना पराभूत करायचं होतं असं ते म्हणाले होते.

२०१४ मध्ये जेव्हा नितीन गडकरींनी पहिल्यांदा नागपूरची जागा जिंकली, तेव्हा त्याचे श्रेय काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी मोदी लाटेला दिले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव केला. पण, २०१४ च्या तुलनेत त्यांच्या मताधिक्क्यामध्ये घसरण झाली होती. आथा तिसर्‍या टर्मच्या आव्हानाचा सामना करताना गडकरींवर केवळ जिंकण्याचेच नव्हे तर विजयाचे अंतर वाढवण्याचेही दडपण होते.

निवडणुकीपूर्वी गडकरींनी ’काम करणार्‍यांना कमी प्रसिद्धी मिळते,’ अशी टीका केली.भाजप बहुमताचा आकडा गाठण्यात कमी पडल्याने, नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या तिसर्‍या कार्यकाळावर प्रश्न निर्माण होतात दिसत आहे. विशेषत: त्यांनी कधीही अल्पमतातल्या सरकारचे नेतृत्व केलेले नाही. लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक निकालानंतर आरएसएस यावर विचार करु शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...