spot_img
अहमदनगरश्रीगोंदा तालुक्यात पाण्याअभावी अनेक गावे तहानलेली

श्रीगोंदा तालुक्यात पाण्याअभावी अनेक गावे तहानलेली

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री

श्रीगोंदा तालुक्यात उन्हाळी हंगाम अंतिम टप्प्यात येत असतानाच पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. कुकडीचे आवर्तन  ३० मे पासून सोडण्यात आलेले आहे. अन्यथा सर्वांनाच पाणी पाणी करण्याची वेळ येऊन ठेपली असती. सद्यस्थितीत कुकडीचे आवर्तन १४०० युसेस ने सोडण्यात आले असून; धरणापासून हे आवर्तन ७८ किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती कुकडीच्या संबंधित अधिकार्‍यांकडून दिली गेली. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार टेल टू हेड असे धोरण आवर्तन कालावधीत राबविले जात असल्यामुळे श्रीगोंदेकरांना किमान आठ दिवस तरी  आवर्तनाची वाट पाहावी लागेल; असे चित्र तूर्त तरी दिसून येत आहे.

प्रथम हे आवर्तन कर्जत करमाळ्याकडे मार्गस्थ होणार आहे.  मात्र मागील आवर्तनात श्रीगोंदेकरांना फक्त सहा दिवसच कसेबसे आवर्तन मिळाल्याने उन्हाळी पिके फळबागा याबरोबरच पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय जटिल बनला आहे. त्यामध्ये मांडवगण गटात पिण्याच्या पाण्याची अतिशय बिकट अवस्था झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे संपूर्ण श्रीगोंदा तालुयात विशेषत: कुकडी लाभ क्षेत्रात हंडाभर पाण्यासाठी सर्वांचीच भटकंती सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही गावांना तालुका प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असल्याचे दिसते. पाऊस लवकर सुरू झाला तरच पिण्याचा पाण्याचा प्रश्न थोडाबहुत सुटू शकतो; अन्यथा चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथम गावोगावी कुकडी लाभ क्षेत्रात जिल्हा प्रशासनाकडून यादीनुसार गावतलाव भरून घेतले जाणार आहेत. नंतर शेती पिकांसाठी हे पाणी असणार आहे. कारण गावतलाव कोरडे पडल्याने जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे प्रथम गावतलाव भरण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याचे तसेच कुकडीचे आवर्तन हे पाऊस पडेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे कुकडीचे कार्यकारी अभियंता श्री. वाळके यांनी सांगितले. सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता अत्यंत तीव्र स्वरूपाची असल्याने आहे त्या पाण्याचे  मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे जलसाठा कमी होत चालल्याचे बोलले जात आहे.

श्रीगोंदा तालुयात अनेक फळबागा आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पारगाव सुद्रिक; लोणी व्यंकनाथ; बेलवंडी व इतर अन्य गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात फळबागा आहे. अनेकांची उपजीविकाही फळबागांवर अवलंबून आहे. परंतु जलसाठा संपुष्टात आल्याने या फळबागा अंतिम घटका मोजत आहेत. मागील आवर्तन कालावधीत श्रीगोंदेकरांना तुटपुंजे आवर्तन मिळाल्याने उन्हाळी हंगामातील पिकांचे उत्पादनही घटले गेले आहे. पाणीप्रश्न तीव्र बनला गेला आहे. तालुयातील कुकडी लाभक्षेत्रात कमी आवर्तन मिळाल्याने तालुका प्रशासनाला शेतकर्‍यांनी घेराव घालून खडे बोल सुनावले होते; परंतु निवडणूणक आचारसंहिता व निवडणुकांसाठी अनेक कर्मचार्‍यांच्या नेमणुका झाल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.

त्याचा फटका शेतकर्‍यांना बसलाच; शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील अतिशय गंभीर बनला गेला आहे. सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाभेटून कुकडी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या तीव्र भावना व्यक्त केली. उभी पिके, फळबागा व पिण्याच्या पाण्या संदर्भात तातडीने आवर्तन सोडण्यासंदर्भात निवेदन सादर केले.

काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी देखील तहसील कार्यालयासमोर कुकडी आवर्तनासंदर्भात धरणे धरून प्रशासनाचे लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने ३० मे पासूनच कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात कुकडी लाभक्षेत्रात निश्चितच या आवर्तनचा शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

अहमदनगर । नगर सहयाद्री :- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात...

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...