spot_img
ब्रेकिंग'कलाकेंद्र ठरतायेत गुन्हेगाराचे अड्डे' जामखेडच्या 'त्या' कलाकेंद्रावर रात्री नेमकं घडलं काय? पहा..

‘कलाकेंद्र ठरतायेत गुन्हेगाराचे अड्डे’ जामखेडच्या ‘त्या’ कलाकेंद्रावर रात्री नेमकं घडलं काय? पहा..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री
कलाकेंद्रावर गेलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला कोणतेही कारण नसताना दोघांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहा दिवसांनी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जामखेड पोलीसात पाहण्यात फिर्यादी उजेफ रफीक शेख ( रा. सदाफुले वस्ती जामखेड ) यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवार दि. २६ रोजी रात्री अकरा वाजता जामखेड शहराच्या उत्तरेस दोन कि.मी. अंतरावर असलेल्या स्वराज कलाकेंद्रावर गेलो असता तेथे ओळखीचे असलेले विक्रम डाडर व सोनु वाघमारे यांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

आरोपी सोनु वाघमारे याने फिर्यादी उजेफ शेख यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्याच्या दिशेने दगड फेकून मारला व दुसरा आरोपी विक्रम डाडर याने लोखंडी रॉडच्य साह्याने मानेवर मारहाण करत दोघांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीस खड्ड्यात फेकून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

जामखेड व मोहा हद्दीत असलेले कलाकेंद्रात सातत्याने मारहाणीच्या घटना घडत असून कलाकेंद्र रात्रभर चालू राहतात. जामखेड तालुका चार जिल्ह्याच्या सिमेवर असल्याने राज्यभरातील गुंड कलाकेंद्रावर येत असतात व मारहाणीच्या घटनेकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. यामुळे जामखेड मधील कलाकेंद्र पुन्हा चर्चेत आले आहे.

पोलिसांसोबत गुन्हेगाराचे संगणमत
जामखेड तालुक्यात गेल्या आठ दहा दिवसांपासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. परंतु पोलीस गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करतात. यामुळे जामखेड तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असून गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. पोलीस व गुन्हेगार यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याच्या चर्चेला जनतेमधून
उधाण आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुन्हा ताबेमारी? ‘ते’ आले आन सुरु झाले..; जमिनीचा ताबा घेण्यासाठी सराईत गुंडांकडून कटूंबावर हल्ला

Ahmednagar Crime News: नेवासा तालुक्यातील वरखेड येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी सराईत गुंडांकडून लोखंडी रॉड...

Ahmednagar Crime News: भर रस्त्यात काढली विद्यार्थीनीची छेड? गुन्हा दाखल

अहमदनगर । नगर सहयाद्री:- क्लासवरून घरी जात असताना विद्यार्थीनीचा पाठलाग करून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल...

राज्यात विधानसभेचे बिगुल वाजणार! कधी होणार घोषणा? निवडणूक आयोगाने…

Vidhan Sabha Election:आगामी विधानसभेचे वारे राज्यात वाहण्यास सुरवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात दणदणीत...

आजचे राशी भविष्य ‘या’ राशींसाठी व्यावसायिकांना आजचा दिवस…

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशिब फळफळेल...