नगर सहयाद्री टीम
पुण्यातील कल्याणीनगरात एका बेफाम कार चालकाने एका पल्सर बाईकला प्रचंड वेगाने उडवल्याने त्यावर बसलेल्या तरुण आणि तरुणींचा हकनाक बळी गेल्याची घटना शनिवारी, १८ मे रोजी रात्री मध्यरात्री घडली. या भीषण अपघातात आलिशान महागड्या पोर्श कारचा चालक हा अल्पवयीन असल्याचे समोर आले असून या प्रकरणात तीन पिढ्या सध्या तुरुंगात आहेत.
या प्रकरणाचा कोणीही धडा घ्यायला तयार नसून अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले सुसाट वेगाने गाड्या पळवत असून पुण्यासारख्या घटना घडू नये म्हणून पोलिसांनी याबाबत प्रतिबंधतामक कारवाई करत आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? तुमच्या गाडीचा विमा असूनही अल्पवयीन वाहन चालक असला तर तुम्हाला विमा असूनही उपयोग होणार नाही.याउलट तुम्हाला कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वेळीच सावधानी बाळगणे गरजेचे आहे.
गाडीचा विमा असूनही उपयोग होणार नाही
अल्पवयीन वाहन चालवणे ही एक वाढती समस्या आहे, अनेक तरुण योग्य प्रशिक्षण किंवा अनुभवाशिवाय वाहन चालवतात. काय गाडीचा विमा असला तरी अल्पवयीन ड्रायव्हरमुळे दावा स्वीकारला जाणार नाही. मोटार वाहन कायद्यानुसार १८ वर्षांखालील वाहन चालवताना पकडले गेलेले कोणीही अल्पवयीन ड्रायव्हर मानले जाते. अल्पवयीन वाहनचालकांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.
वाहन मालकाला २५ हजार दंड व तीन वर्ष शिक्षा
अल्पवयीन वाहन चालवण्याचा दंड केवळ चालकालाच लागू होत नाही, तर वाहन मालकालाही लागू होतो. दुसऱ्याचे वाहन चालवताना पकडले, तर वाहन मालकालाही जबाबदार धरले जाऊ शकते आणि त्याला दंड आणि दंडाला सामोरे जावे लागू शकते. यामध्ये वाहनधारकाला २५ हजार रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. त्यांना ३ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. यासोबतच वाहनाची नोंदणी वर्षभरासाठी रद्द केली जाणार आहे.