spot_img
ब्रेकिंगधरणाची अवस्था अत्यंत वाईट, सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष: शरद पवार

धरणाची अवस्था अत्यंत वाईट, सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष: शरद पवार

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुष्काळी स्थितीवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याच्या टंचाईमुळे चिंताजनक स्थिती आहे. धरणाची अवस्था अत्यंत वाईट आहे. संभाजीनगरमध्ये १० टक्के पाणी आहे. पुणे विभागात ३५ धरणं आहेत तिथे १६ टक्के पाणीसाठा आहे. नाशिकमध्ये २२ धरणे आहेत तिथे २२ टक्के पाणी आहे. कोकणात २९ टक्के पाणी आहे, अशी माहिती पवारांनी दिली आहे.

उजनी धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठी शून्य आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ५ टक्के पाठीसाठा आहे, माजलगावमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मांजरा धरणात अर्धा टक्का सुद्धा पाणी नाही. धाराशिव जिल्हात शून्य टक्के पाणीसाठा आहे. अहमदनगरमध्ये ९ टक्के पाणीसाठा आहे, असे पवार म्हणाले.
राज्यात यंदा १०, ५७२ टँकर लागत आहेत, मागील वर्षी १,१०८ टँकर लागत होते.

यावरुन स्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्यांची मागणी करण्यात येत आहे. संभाजीनगर आणि पुण्यामध्ये दुष्काळी काम काढणं, किंवा रोजगार हमीचे कामं काढणं आवश्यक आहे, असं शरद पवार यांनी सूचवले आहे. राज्याची स्थिती गंभीर असून सरकारचे त्याकडे लक्ष नसल्याची टीका पवारांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...