spot_img
ब्रेकिंग'त्यांना सुखरूप परत आणा...' किर्गिझस्तानमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आ. तांबेंचा पुढाकार

‘त्यांना सुखरूप परत आणा…’ किर्गिझस्तानमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आ. तांबेंचा पुढाकार

spot_img

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना पत्राद्वारे केली विनंती
संगमनेर । नगर सहयाद्री
किर्गिझस्तानमध्ये पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या वांशिक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी थेट परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवलं आहे. या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातील असून त्यांच्यासह सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी भारताने प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसं किर्गिझस्तानच्या सरकारशी बोलून या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येईल का, याचीही चाचपणी करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात पाकिस्तानी आणि भारतीय विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं गेलं. त्यानंतर या देशात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या १० हजारांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हे विद्यार्थी हॉस्टेलच्या बाहेर पडण्यासही घाबरत आहेत. तर अनेकांनी देश सोडून जाण्यासाठी थेट विमानतळ गाठलं आहे. या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांमधील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

किर्गिझस्तानमध्ये अडकून पडलेल्या आणि हल्ल्याच्या भीतीने गर्भगळीत झालेल्या या विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. हे विद्यार्थी उज्ज्वल भविष्याची आशा घेऊन तिथे गेले आहेत. मात्र आता ते अडकून पडले असतील, तर त्यांना सुखरूप भारतात आणायला हवं. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांच्या परतीची व्यवस्था करावी, अशी मागणी मी पत्राद्वारे केली आहे, असं आ. सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं.

आपल्या विद्यार्थी चळवळीच्या काळापासूनच विद्यार्थ्यांच्या व्यापक हितासाठी पुढाकार घेणाऱ्या आ. तांबे यांनी या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, या बाबीकडेही जयशंकर यांचं लक्ष पत्राद्वारे वेधलं आहे. जोपर्यंत किर्गिझस्तानमधील परिस्थिती पूर्ववत आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित होत नाही, तोपर्यंत तेथील विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने घ्यावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. यासाठीही परराष्ट्र मंत्रालयाने प्रयत्न करावे, अशी मागणीही आ. तांबे यांनी केली आहे.

हे विद्यार्थी म्हणजे देशाचं भविष्य!
किर्गिझस्तानमध्ये शिकणारे हे विद्यार्थी हुशार आहेत. देशाचं भविष्य घडवण्याची ताकद त्यांच्या मनगटांत आहे. आत्ता ते अडचणीत आहेत आणि त्यांना परत मायभूमीत आणणं, हे आपलं कर्तव्य आहे. यासाठी माझ्या परीने जे करता येईल, ते सगळं मी करेन. परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून मी त्यांना परत आणण्याची मागणी केली आहे. तसंच त्यांचं काही शैक्षणिक नुकसान झालं, तर ते कसं भरून काढता येईल, यासाठीच्या आराखड्याबाबतही आम्ही विचार करत आहोत.

– आ. सत्यजीत तांबे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या...

मार्केटींगसाठी ठेवलेल्या मुलीवर अत्याचार; पती-पत्नी आरोपी, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान नगरला; आमदार संग्राम जगताप म्हणाले…

नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर |...

धुक्यात नगर हरवले; नगर-सोलापूर रोडवर अपघात; मोठा अनर्थ टळला

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर...