मुंबई / नगर सह्याद्री
मान्सूनच्या आगमानची चातकासारखी वाट पहात असणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तर दोन ते तीन दिवस आगोदर अंदमानात मान्सून दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
इतकंच नाहीतर अंदमानात मान्सून दाखल झाल्यानंतर हा मान्सून पुढे सक्रीय होण्यासाठी पोषक वातावरण अरबी समुद्रात निर्माण झालंय. अरबी समुद्रात वार्याचा वेग देखील वाढला आहे. मान्सून अंदमान, मालदीव, निकोबार आणि अरबी समुद्र मान्सून सक्रीय होण्यासाठीची पुरक परिस्थिती पुढे निर्माण झाली आहे.
कोकणात अवकाळी पाऊस पडत असून रत्नागिरीत ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा केरळ, गोवा त्यानंतर महाराष्ट्र असा मान्सूचा प्रवास येत्या दोन दिवसांत पाहायला मिळणार आहे.