नगर सहयाद्री टीम-
उत्तम आरोग्य हाच खरा ‘दागिना’ आहे. उत्तम आरोगयासाठी सर्वत्तम आहाराची गरज असते. डॉक्ट्रर वेळोवेळी फळे आणि भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. पण अशा काही भाज्या आहेत ‘त्या’ आरोग्याला हानिकारक ठरत आसतात. जंक फूड पासून सावध होत आपण ते खाणं बंद करतो पण भाज्यांमध्ये सुद्धा काही भाज्या अशा आहेत ज्या जास्त प्रमाणात खाल्ल्यानं नुकसान होतं.तर हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहेत. साधारण एका दिवसामध्ये किमान दोन तरी हिरव्या भाज्या आहारात घेतल्या पाहिजेत.
हानिकारक भाज्या
वाटाणा
वाटाण्याची भाजी अनेकांना आवडते. वाटण्याची भाजी बनवायला सोपी आणि चवीला मस्त असते. वाटण्याचं सेवन जर मर्यादित प्रमाणात होत असेल तर ते आरोग्यासाठी चांगलं आहे पण वाटण्याचं सेवन अधिक प्रमाणात होत असेल तर त्याने पोट वाढतं. वाटाणा फायबरचा चांगला स्रोत आहे. फायबरच्या अतिसेवनामुळे पोट वाढते.
बटाटे
बटाटे सगळ्यांनाच खायला आवडतात. आपल्याला जवळजवळ सगळ्याच पदार्थांमध्ये बटाटे असतात. स्नॅक्स, भाजी, भजी किंवा अजून काही असेल प्रत्येकात बटाटे. पण बटाटे आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी बटाटे खाऊ नयेत.
बीट
आहारात बीटरूटचा समावेश करताना विचारपूर्वक करा. जास्त प्रमाणात बीटरूट खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते, बीटरूटमध्ये नैसर्गिक साखर जास्त प्रमाणात असते. बीटरूटचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत पण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी याचे सेवन करू नये.
टोमॅटो
डब्बाबंद टोमॅटो असतं. टोमॅटो डब्ब्यात टाकून त्याला स्टोअर केलं जातं आणि त्याची भाजी खाल्ली जाते. य टोमॅटोमध्ये सोडियमचे प्रमाण खूप असते ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. हे टोमॅटो प्रक्रिया करून डब्ब्यात बंद करून फ्रिजमध्ये ठेवले जातात. डब्बा बंद टोमॅटो खाण्याऐवजी तुम्ही ताजे टोमॅटो खाऊ शकता ते आरोग्यासाठी चांगले असतात.
लाभदायक भाज्या
पालक, मेथी, चवळी, चुका, शेपू इत्यादी भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. कोणत्याही रोगात, डॉक्टर हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरी आढळतात. यामध्ये कार्बोहायड्रेट देखील कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यातील पोषक घटक आणि अँटिऑक्सिडेंट्समुळे आपल्या हृदय आणि डोळ्यांनादेखील फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात. आपल्या दिवसाची सुरुवात हिरव्या पालेभाजीच्या सुपने केली पाहिजे.