मुंबई। नगर सहयाद्री
‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतची खालावली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भूमी हिच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. प्रकृती खालावल्यामुळे अभिनेत्रील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अभिनेत्रीचा रुग्णालयातील फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राखी सावंत हृदयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत प्रकृती खालावल्याने सध्या चर्चेत आहे. पापराझी विरल भयानीने राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यात राखी सावंत बेडवर झोपलेली दिसून येत आहे. काही फोटोंमध्ये तिच्या हातावर सलाईन लावलेलं दिसत आहे. एका फोटोमध्ये नर्स तिचं बीपी चेक करताना दिसत आहे.राखी सावंतच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. तर काही नेटकरी याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
देवा रुग्णालयातील लोकांना हिंमत दे, ती कशीही असली तरी देवा कोणाला रुग्णलयाची पायरी चढायला देऊ नको, राखीवर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे, ओव्हर अॅक्टिंगचे साईट इफेक्ट्स, लवकर ठीक हो, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत