spot_img
ब्रेकिंगAhmadnagar Politics: प्रचार सभेत शरद पवारांनी घेतला सरकारचा 'समाचार', म्हणाले पंतप्रधान मोदींना..

Ahmadnagar Politics: प्रचार सभेत शरद पवारांनी घेतला सरकारचा ‘समाचार’, म्हणाले पंतप्रधान मोदींना..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
गेली पन्नास वर्ष एक आत्मा महाराष्ट्रात फिरत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यावर पलटवार करत शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. आत्मा ५० वर्ष नाही तर ५६ वर्षापासून हिंडतोय. मला विधानसभेत येऊन यंदा ५६ वर्ष झाली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शरद पवार यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

अहमदनगर लोसकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा येथे जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार बोलत होते. यावेळी शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार राहुल जगताप, स्टार प्रचारक नितेश कराळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, साजन पाचपुते यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

मोदी हे राज्यात प्रचार सभेत बोलताना माझ्यावर किंवा उद्धव ठाकरेंवर टीका करतात. कारण त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे नाहीत पंतप्रधान मोदींना सांगायचंय, राज्यात हा आत्मा ५० वर्ष नाही तर ५६ वर्षांपासून फिरत आहे. कारण मला राज्यातील विधानसभेत येऊन यंदा ५६ वर्ष झाली असल्याच ते म्हणाले. यावेळी खा. संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर सडकून टीका करत उमेदवार लंके यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी उमेदवार नीलेश लंके, माजी आमदार राहुल जगताप यांचीही भाषणे झाली.

आ. थोरात यांनी दिला आयपीएलचा दाखला
निलेश लंके यांच्या प्रचाराच्या सभा पाहिलेल्या आहेत. निलेश लंकेंच्या सभेतील कार्यकर्त्यांचा करंट ३००० चा व्होल्ट असतो. तीन हजार व्होल्टचा करंट असेल तर शॉक कसा असणार, जाळ होणार जाळ असं बाळासाहेब थोरात म्हणाले. कांद्याची बाजारपेठ ठप्प आहे. कांद्याची निर्यातबंदी उठवली असं सांगितले गेले. पण, एकाच ठिकाणाहून कांद्याची निर्यात होतेय, ते म्हणजे गुजरात होय, फक्त गुजरातसाठी निर्णय घेतले जातात. मला तर आणखी एक गोष्ट कळाली की एवढंच काय तर आयपीएल सुरू आहे, तिथे मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा व्हायला हवा तर तिथं हार्दिक पांड्या कॅप्टन झाला. तिथे क्रिकेटवाले लोक नाराज झाले कारण तो गुजरातचा आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

साकळाई बाबत दिलेला शब्द पाळला का?
लोकांचा उस्ताह पाहून आजच निलेश लंके विजयी झाल्याचे जाहीर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदींनी कालच्या भाषनात सामाजिक द्वेष पूर्ण वक्तव्य केले. सन २०१४ आणि २०१९ च मोदी वारं ओसरलय, महाविकासचे ३५ आमदार निवडून येतील, भाजपा २०० पार सुद्धा जाणार नाही आणि लंके २ लक्ष पार जाणार आहेत. साकळाई बाबत दिलेला शब्द विखेंनी पाळला नाही. मंग जनतेने ठरवावे. कर्जत, जामखेड पेक्षा श्रीगोंद्याने निलेश लंकेना लीड द्या. असे आवाहन यावेळी रोहीत पवार यांनी सभेत केले.

प्रभु राम, कृष्ण, आणि तेहत्तीस कोटी देवांनीच ठरवलय.. मोदींना पाडायच..
निलेश लंके मधील शिवसैनिक जागा आहे. धमण्यात भगव रक्त आणि विचार आजही कायम आहे. श्रीगोंद्यातील जनता जागरूक आणि अभ्यासू आहे. महाराष्ट्रातील मोजक्या जागा पैकी विना प्रचाराची विजय होणारी जागा लंकेची आहे. शिवसेना पूर्ण ताकतीने लंकेच्या पाठीमागे उभे आहेत. इंग्लीश बोलण्यापेक्षा संसदेत सामान्यांचे कामं केले का..? याचा लेखाजोखा घ्या.. गेल्या दहा वर्षात मोदी कधी महाराष्ट्रात आले की, आठ दिवसांपूर्वीच समजायचं, मात्र काल नगर मध्ये आल्याचे आज समजलं.. यावेळी प्रभु राम, कृष्ण, आणि तेहत्तीस कोटी देवांनीच ठरवलय.. मोदींना पाडायच आहे.
-खासदार संजय राऊत

याप्रसंगी उमेदवार आ. निलेश लंके, माजी आ. राहुल जगताप, निलेश कराळे यांची ही भाषणे झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...