spot_img
अहमदनगरखळबळजनक प्रकार! नगरमध्ये लोकसभा उमेदवाराच्या वाहनावर दगडफेक

खळबळजनक प्रकार! नगरमध्ये लोकसभा उमेदवाराच्या वाहनावर दगडफेक

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहे.

शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते सोमवार दि. ०६ मे रोजी आपल्या प्रचारार्थ नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील काही गावात गेल्या होत्या. प्रचार दौरा आटोपून रात्री चार चाकी वाहनाने संगमनेरच्या दीशेने जात असतांना चीतळवेढे गावाजवळ अज्ञात हल्लेखोरानी त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली.

त्यांच्या वाहनचालकाने वेळे प्रसंगी सतर्कता दर्शवल्यामुळे या हल्ल्यातून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रूपवते थोडक्यात बचावल्या आहे. घडलेल्या घटनेची माहिती समजताच मतदार संघात मोठी खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या...

मार्केटींगसाठी ठेवलेल्या मुलीवर अत्याचार; पती-पत्नी आरोपी, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान नगरला; आमदार संग्राम जगताप म्हणाले…

नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर |...

धुक्यात नगर हरवले; नगर-सोलापूर रोडवर अपघात; मोठा अनर्थ टळला

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर...