spot_img
अहमदनगरखासदार विखे आमदार लंकेंची तक्रार करणार? नेमकं कारण काय..

खासदार विखे आमदार लंकेंची तक्रार करणार? नेमकं कारण काय..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
रखरखत्या ऊन्हाळ्या प्रमाणे नगरचे राजकारण देखील तापत आहे. एकीकडे लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे महाआघाडीच्या प्रचाराच्या भव्य रॅलीत कुटुंबाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

मारहाणीचा प्रकार महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार लंके यांच्या कट्टर समर्थकांनी केला असल्याचा आरोप महायुतीचे उमदेवार सुजय विखे पाटील यांनी केला असून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?
कल्याण रोड परिसरातील शिवाजीनगर भागात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार लंके यांच्या प्रचारार्थ शनिवार दि.०३ मे रोजी सायंकाळी प्रचार फेरी काढण्यात आली होती. प्रचार फेरी दरम्यान किरकोळ कारणावरून एका कटूंबात आणि आमदार लंके यांच्या समर्थकांमध्ये वाद झाले. यामध्ये मदार लंके यांच्या समर्थकांनी कटुबाला मारहाण केली तसेच यामध्ये एक वृद्ध महिला जखमी झाल्याचा आरोप खासदार सुजय विखे यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...