spot_img
अहमदनगरनगरच्या वीज चोरांना ‘जोरका झटका’! एक चूक नडली, दंडाची कारवाई भवली? वाचा...

नगरच्या वीज चोरांना ‘जोरका झटका’! एक चूक नडली, दंडाची कारवाई भवली? वाचा सविस्तर..

spot_img

भरारी पथकांनी कोट्यवधीची वीज चोरी पकडली
अहमदनगर। नगर सहयाद्री
वीजचोरी व अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरण गंभीर असून, सातत्याने याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत महावितरणने जिल्ह्यात वीज चोरी व गैरवापर करणाऱ्याविरूध्द एप्रिल मध्ये आकस्मिक व धडक कारवाई केली आहे.

अधिक माहिती अशी: महावितरणच्या कोकण परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या १२ विविध भरारी पथकांनी अहमदनगर जिल्ह्यात व मुख्यतः शेगाव उपविभागातील परिसरात २२ ते २५ एप्रिल रोजी सलग तीन दिवस सातत्याने वीजचोरांच्या विरोधात मोहीम राबवली आणि या मोहिमेमध्ये एकूण अंदाजित दोन कोटींची वीज चोरी उघडकीस आणली. या कारवाईमध्ये जिल्ह्यातील दोन ऑईल मिल कंपन्यांची सुद्धा वीज चोरी उघडकीस आली आहे.

जिल्ह्यात काही भागात वीज चोरी होत असल्याची माहिती दक्षता आणि सुरक्षा अंमलबजावणी विभागाला प्राप्त झाली होती, याची तपासणी करण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक विनायक नराळे आणि उपसंचालक सुमित कुमार यांनी सहाय्यक संचालक बबन साठे यांच्या नेतृत्वाखाली १२ तपासणी पथकांची स्थापना केली.

या तपासणी तथा भरारी पथकाने मोहीम राबवित जिल्ह्यातील लघुदाब वीज ग्राहकांच्या विद्युत मीटरची तपासणी करून वीज चोरी उघडकीस आणली.यामध्ये महावितरणच्या विविध भरारी पथकाकडून संशयास्पद २५० विद्युत ग्राहकांच्या वीज मीटर संचाची व परिसराची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १६३ ग्राहकांकडे वीज चोरी तर ६ ग्राहकांकडे अनियमितता उघडकीस आली. या मोहिमेत जिल्ह्यातील गौरी ऑईल मिल आणि शिवकृपा ऑईल मिल या दोन ऑईल मिल कंपन्यांनी वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले.

सदर ग्राहकांना देय असलेले निर्धारण व तडजोड रकमेची देयके देण्यात आली असून त्यांनी निर्धारित मुदतीत न भरल्यास पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील असून वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणा-यावर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी बेकायदेशीर वीज वापर करीत असल्याचे आढळून आलेल्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येते. वीज देयक न भरणाऱ्या ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला अशा ठिकाणी सुद्धा बेकायदेशीर वीज वापर करताना आढळल्यास त्यांचे विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येते.

वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणारअसून तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन वेळोवेळी केले आहे. वीज चोरी करणे हा दंडनीय अपराध असून गुन्हा सिद्ध झाला तर कठोर कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. आपल्या परिसरात वीज चोरी होत असल्यास महावितरणच्या जवळील कार्यालयात याची माहिती द्यावी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येते.असे आवाहन महावितरणने केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या...

मार्केटींगसाठी ठेवलेल्या मुलीवर अत्याचार; पती-पत्नी आरोपी, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान नगरला; आमदार संग्राम जगताप म्हणाले…

नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर |...

धुक्यात नगर हरवले; नगर-सोलापूर रोडवर अपघात; मोठा अनर्थ टळला

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर...