spot_img
अहमदनगरमाझा विजयाचा सर्वे गरिबांच्या मनात..? आ. लंकेच्या बालेकिल्ल्यात खा.विखेंनी व्यक्त केला विश्वास

माझा विजयाचा सर्वे गरिबांच्या मनात..? आ. लंकेच्या बालेकिल्ल्यात खा.विखेंनी व्यक्त केला विश्वास

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
लोकसभेचा महाकुंभ सजला असून जिल्ह्यात जोरदार तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकींच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे. नुकताच पारनेर तालुक्यात महायुतीचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान विरोधकांना घेरत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मला विजयी करण्याचा सर्वे गरिबांच्या मनात असल्याचा विश्वास ठामपणे व्यक्त केला.

यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, प्रा. विश्वनाथ कोरडे, राष्ट्रबादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड, बंडू रोहकले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.

खा विखे पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूक ही देशाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडून भारतीय जनता पक्ष मतदान मागत आहे.

मागच्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनाचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहचवला. जे प्रामाणिकपणे केले तेच आपण लोकांमध्ये जाऊन सांगत आहोत. इतरांसारखी खोटी सहानुभूती मिळवायची नाही.

कोव्हीड संकटात डॉक्टर नात्याने आपणही हजारो रुग्णांची सेवा केली. पण समोर रूग्ण मरणाशी झुंज देत असताना त्याच्याबर उपचार करतानाचे व्हीडीओ टाकण्याचा मोह आपल्याला कधी झाला नाही, आणि होणार ही नाही.

जीवाभावाच्या लोकांमुळेच विखे परीवाराला अनेक वर्षे संधी मिळाली. आमचा सर्वे लोकांच्या मनात आहे. कोणाचेही सर्वे येऊ द्या. माझा विजयाचा सर्वे गरिबांच्या मनात असून सर्वाधिक मतांची आघाडी मिळणार असल्याचा दावा खा. सुजय विखे पाटील यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...