spot_img
अहमदनगरmp sujay vikhe patil news : भाजपच्या चारशे जागांच्या यशात खा. सुजय...

mp sujay vikhe patil news : भाजपच्या चारशे जागांच्या यशात खा. सुजय विखेंचा सहभाग राहील

spot_img

भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचा विश्वास
अहमदनगर / नगर सह्याद्री –

mp sujay vikhe patil news : सरकारच्या योजनांची गॅरेंटी देशातील जनतेला आली आहे. देशाने पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्विकारले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता येणार असून अहिल्यानगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचाही समावेश चारशे जागांच्या ऐतिहासिक विजयात राहील असा विश्वास अहिल्यानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी व्यक्त केला आहे.

नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुती कडून सुरू असलेल्या प्रचाराची माहीती जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

भालसिंग म्हणाले की, मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगाच्या केंद्रस्थानी पोहचविले आहे. मोदींच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात भारत आर्थिक महासत्ता म्हणुन उदयास येईल यात कोणतीही शंका नाही. मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या यामुळेच देशातील ३० कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले. महिलांना अनेक योजनांच्या मार्फत बळकटी देण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय संबंधात सुधारणा झाली. यामुळे मोदींच्या नेतृत्वात भारताची विकसित देशाकडे वाटचाल होत असताना देशाने मोदींवर विश्वास ठेवला आहे लोकसभा निवडणुकीच्या निमिताने मोदीच्या नेतृत्वाखाली झालेले निर्णय मतदारपर्यत पोहचविण्याचे काम प्रचाराच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्ते करीत असल्याचे सांगितले.

खा. डॉ. सुजय विखे यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निधी आणुन जिल्ह्यात विविध विकासकामे पुर्ण केली आहेत. त्याच प्रमाणे शासनाच्या विविध योजना शेवटच्या लाभार्थ्यां पर्यंत त्यांनी पोहचविल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी करणारा जिल्हा म्हणून अहील्यानगर प्रथम क्रमांकावर असल्याकडे भालसिंग यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

राजकारणा पलिकडे जावून आरोग्य शिबीर कोव्हीड संकटात केलेले काम नगर जिल्ह्यातील जनतेते अनुभवले आहे. त्यामुळेच डॉ. सुजय विखे पाटील लोकप्रिय ठरले निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने खा.विखे पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहाता पुन्हा एखादा खासदार म्हणुन मोदींच्या टीम मध्ये असणार आहेत. नगरच्या जनतेने विखे यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे भालसिंग म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...