spot_img
अहमदनगररेकॉर्डवरील गुन्हेगार ‘बिरज्या’ जेरबंद!! क्लेरा ब्रूस मैदानात 'असा' लावला सापळा

रेकॉर्डवरील गुन्हेगार ‘बिरज्या’ जेरबंद!! क्लेरा ब्रूस मैदानात ‘असा’ लावला सापळा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
कमरेला प्राणघातक असे अग्निशस्त्र लावूृन क्लेरा ब्रूस मैदान येथे उभ्या असलेल्या बिरजू राजू जाधव उर्फ बिरज्या (वय-२६ वर्षे, रा. मकासरे चाळ, कोठी-स्टेशन रोड, पाटील हॉस्पिटलच्या पाठीमागे, अहमदनगर) यास पोलीस पथकाने पकडल्याची घटना गेल्या ०४ एप्रिल रोजी घडली.

गेल्या ०४ एप्रिल रोजी दुपार दोन वाजण्याच्या सुमारास नगर शहरातील लेरा ब्रूस मैदान येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार विरजू जाधव हा कमरेला अग्निशस्त्र लावून थांबलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून तात्काळ पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाचे सह पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे या आपले सहकारी व पंचासह वाहनाने तेथे पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार झाडाखाली एका इसम हा संशयास्पदरीत्या थांबलेला पोलीस पथकाला दिसला. हा इसम रेकॉर्डवरील गुन्हेगार विरजू जाधव असल्याची खात्री होताच पोलीस पथकाने त्यास पकडण्याच्या प्रयत्नात असता तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.

तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद लहारे, सुरज कदम, तानाजी पवार यांनी त्यास जागीच पकडले. सपोनि योगिता कोकाटे यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याचे नाव, पत्ता विचारला असता त्याने नाव व उपरोक्त पत्ता सांगितले. त्याची पोलिसांनी उपस्थित पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३० हजार रुपये रुपये किमतीचे एक लोखंडी स्टील कलरचे गावठी बनावटीचे अग्निशस्र आढळून आले. त्या शस्त्राच्या मुठीला खालच्या बाजूने आत मॅगझीन लावलेले होते. शिवाय एक हजार रुपये किमतीचे दोन लहान आकाराची काडतुसे अग्रिशस्त्राच्या मॅगझीनमध्ये आढळून आले.

असा एकून ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. सपोनि योगिता कोकाटे यांनी पंचासमक्ष नमूद मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी बिरजू जाधव यास पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद लहारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी जाधव विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि योगिता कोकाटे या करीत आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि योगीता कोकाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे, ए. पो. इनामदार, संदीप पितळे, पोलीस नाईक अविनाश वाकचौरे, संगीता बडे, पोकॉ दीपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सचिन लोळगे, अमोल गाडे, सुजय हिवाळे आदींनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती ; शिक्षक नेते संजय धामणे यांचे संचालक मंडळावर गंभीर आरोप

अहमदनगर / नगर सह्याद्री - प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती, सॉफ्टवेअर खरेदीसह जाहिराती व संचालक...

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....