आप्पा चव्हाण / नगर सह्याद्री : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू व जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, नाना पारदे तालुका अध्यक्ष नगर यांच्या कार्याला प्रेरित होऊन श्रीगोंदा येथील युवकांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी कृष्णा खामकर. प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीगोंदा शहराध्यक्षपदी माधव बनसोडे तर श्रीगोंदा तालुका उपाध्यक्षपदी संदीप सुभाष आढाव व ज्ञानदेव भैलुमे, गुरु गायकवाड तालुका अध्यक्ष युवक, अमोल कांबळे तालुका उपाध्यक्ष युवक आदींची निवड करण्यात आली. गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४ रोजी सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथे झालेल्या आढावा बैठकीत नियुक्ती करण्यात आली.
प्रहार जनशक्ती पक्ष सर्वच राजकीय पक्षापेक्षा आगळे वेगळे काम करत असून प्रहार १०% राजकारण व ९०% समाजकारण करत आहे. असंख्यजन प्रहार पक्षात सामील होत आहेत असे सुरेश सुपेकर यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी उपस्थित विजू भंडारी संघटक अध्यक्ष, अंकुश शिंदे, अमोल झेंडे, दत्ता वाळके, जयदीप मगर, प्रिया काळे महिला तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.