spot_img
ब्रेकिंगमराठा समाजाच्या बैठकीत राडा! आरोप प्रत्यारोपामुळे वाद, नेमकं काय घडलं?

मराठा समाजाच्या बैठकीत राडा! आरोप प्रत्यारोपामुळे वाद, नेमकं काय घडलं?

spot_img

छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री-
लोकसभेच्या उमेदवारी बाबत मराठा समाजाच्या बैठका सुरु आहेत. अशीच एक बैठक आज (२९ मार्च) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन गट एकमेकांना भिडून हाणामारी झाल्याची घटना घडली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणार्‍या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी काही जणांनी एकमेकांवर हल्ला केला. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे.

आज (दि.२९) सकाळी ११ वाजता मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ६० ते ७० समाज बांधव बैठकीला उपस्थित होते. सुरुवातीला बैठक शांततेच्या मार्गाने सुरू होती, मात्र अचानक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप केला. आरोपानंतर तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात झाली. त्यानंतर इतरही तरुणांनी मारहाण केली. मारहणीनंतर बैठक उधळली गेली आणि पुढे बराच वेळ राडा सुरू होता. राडा झाल्यामुळे उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे.

या बैठकीला आलेल्या एका कार्यकर्त्याने घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ९ ऑगस्ट २०१६ पासून आम्ही सर्वजण सोबत आहोत. मूक मोर्चा निघाला तेव्हा आम्ही सर्वजण सोबत होतो. मात्र अचाकपणे ते विचारत आहेत की तुम्ही कोण आहात. आम्ही कोण आहोत, हे सांगण्यासाठी आम्ही द्यायला तयार आहोत. तुम्ही अमुक व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे, हे सांगण्यासाठी आलो होतो. मात्र त्यांनी आम्हाला शिव्या दिल्या. म्हणूनच मीही त्यांच्या अंगावर गेलो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...