spot_img
अहमदनगरअहमदनगर: पांगरमलमध्ये 'धक्कादायक' प्रकार! तात्याच्या ढाब्यावर दोन मित्रांसोबत घडलं काय? पहा..

अहमदनगर: पांगरमलमध्ये ‘धक्कादायक’ प्रकार! तात्याच्या ढाब्यावर दोन मित्रांसोबत घडलं काय? पहा..

spot_img

अहमदनगर। नगर सह्याद्री-
हॉटेलमधील बेटरला दमदाटी केल्याच्या रागातून दोघा मित्रांवर तलवार, लोखंडी रॉड व स्टिलच्या पाईपने खुनी हल्ला केल्याची घटना नगर तालुक्यातील पांगरमल शिवारात घडली. हल्ल्यात अक्षय आव्हाड व त्यांचे मित्र भाऊसाहेबआव्हाड जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी अक्षय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजिनाथ मुरलीधर आव्हाड, संजय अंबादास आव्हाड, मंगेश संजय आव्हाड (सर्व रा. पांगरमल) व दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४ मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास पांगरमल ते मिरी रस्त्यावरील हॉटेल सुप्रीया (तात्याचा ढाबा) येथे ही घटना घडली. फिर्यादी व त्यांचा मित्र हॉटेलवर असताना वेटरला दम दिल्याच्या कारणावरून अजिनाथ व इतरांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांवर तलवार,लोखंडी रॉड व स्टिलच्या पाईपने खुनी हल्ला केला. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

हल्ल्यात फिर्यादी व त्यांचा मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. जखमी अक्षय आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार, २५ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...