spot_img
अहमदनगरहरेश्वर देवस्थान ट्रस्ट सल्लागार मंडळ जाहीर, संघटकपदी एन. बी. आंधळे यांची निवड

हरेश्वर देवस्थान ट्रस्ट सल्लागार मंडळ जाहीर, संघटकपदी एन. बी. आंधळे यांची निवड

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
कर्जुले हरेश्वर येथील स्वयंभू श्री हरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सल्लागार मंडळाची निवड विश्वस्त मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आली. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत १३ मान्यवरांची सल्लागार मंडळावर निवड करण्यात आली. घटेनतील तरतुदीनुसार या सल्लागार मंडळाच्या संघटकपदी निवृत्ती उर्फ एन. बी. आंधळे यांची निवड अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी जाहीर केली.

पुढील महिन्यात श्री हरेश्वर महाराज यात्रौत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी देवस्थानचे उपाध्यक्ष दत्तात्रय आंधळे, सचिव एकनाथ दाते, सहसचिव बाळासाहेब उंडे, खजिनदार बाबासाहेब उंडे यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते. संस्थानच्या घटनेतील तरतुदीनुसार सल्लागार मंडळ नियुक्तीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

त्यानुसार निवृत्ती भागाजी आंधळे, रामदास बबन दाते, भिमराज तुकाराम आंधळे, रामदास तुकाराम आंधळे, हरिशेठ खंड कोकाटे, विठ्ठल सखाराम जाधव, विलास नामदेव आंधळे, रविंद्र भाऊसाहेब रोकडे (मेजर), गोविंद राधु आंधळे, प्रदिपशेठ मारुती वाफारे, राजेंद्र ठका आंधळे, वसंतराव शंकर आंधळे, बाळु मुरलीधर उंडे व पोपट किसन आंधळे यांची सल्लागार मंडळावर निवड जाहीर करण्यात आली.

सल्लागार मंडळाची निवड जाहीर झाल्यानंतर या सल्लागार मंडळाच्या संघटकपदी निवृत्ती आंधळे यांची निवड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी जाहीर केली. दरम्यान, देवस्थान ट्रस्टचे सचिव एकनाथ दाते हे सल्लागार मंडळाचे नियंत्रक असणार आहेत. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाचे गावकर्‍यांनी अभिनंदन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...