spot_img
अहमदनगरहॅलो साहेब! ११२ नंबरवर पोलिसांना आला फोन, पुढे 'सावेडी' मध्ये घडले असे...

हॅलो साहेब! ११२ नंबरवर पोलिसांना आला फोन, पुढे ‘सावेडी’ मध्ये घडले असे काही…

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
अतिक्रमण केलेल्या जागेत अवैधरित्या गॅस रिफिलिंग सेंटर सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना डायल ११२ नंबरवरून मिळाल्यानंतर त्यांनी सदर गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकला. शनिवारी (दि. २३) दुपारी एकच्या सुमारास सावेडी उपनगरातील कुष्ठधाम रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार महादेव निमसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत दत्ता शिंदे (वय १९रा. वैदूवाडी, सावेडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमलदार निमसे यांची शनिवारी डायल ११२ या प्रणालीच्या एमडीटी मशीनवर ड्युटी होती. त्यावर एका व्यक्तीने फोन करून कुष्ठधाम रस्त्यावरील जगदंबा खानावळच्या पाठीमागे एक इसम घरगुती गॅसची चोरून विक्री करत असल्याची माहिती दिली.

अंमलदार निमसे यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना दिली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या पथकाला पंचासमक्ष खात्री करून कारवाईचे आदेश दिले.

उपनिरीक्षक पाटील यांनी सदर ठिकाणी दुपारी पथकासह छापा टाकला असता संकेत दत्ता शिंदे हा मिळून आला. तो गॅस रिफिलिंग करताना दिसला. त्याला ताब्यात घेत सात हजाराचे साहित्य जप्त केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...