spot_img
ब्रेकिंगराज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा ४० शी पार, वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट

राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा ४० शी पार, वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने यंदा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार उन्हाची तीव्रता जाणविण्यास सुरुवात झाली असून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे.

यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा यामुळे मार्च महिन्याच्या सुरवातीला तापमान कमीच राहिले. यामुळे उन्हाची चालूल देखील यंदा उशिराने लागली आहे. दिवसभर उन्हाचे चटके जाणवत असताना रात्रीच्यावेळी अजून देखील थंडी जाणवत आहे. तरी देखील आज राज्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उन्हाळ्यातील एप्रिल व मे हे आणखी दोन महिने हिट अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक शहरात तापमान चाळिशीपार गेले आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

या आठवड्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात पारा ३६ अंशांवर तो आठवडाभरानंतर म्हणजे २४ मार्चला ४१ अंशावर पोहचला असल्याने वर्दळीच्या रस्त्यावरील काहीसा शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...