spot_img
ब्रेकिंगअहमदनगर: निवडणुकीच्या तोंडावर हवाल्याचे ७२ लाख पकडले? 'असा' लावला सापळा

अहमदनगर: निवडणुकीच्या तोंडावर हवाल्याचे ७२ लाख पकडले? ‘असा’ लावला सापळा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
निवडणूकीचे बिगुल वाजत नाही तोच अहमदनगर मध्ये ७२ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. रोकड हवाल्याची असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरापर्यंत याबाबत पुढील कार्यवाही सुरू होती.

देशात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पोलिस आणि निवडणूक अधिकारी सतर्क झाले आहेत. पोलीस दलाकडून अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, अधीशले यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नाकाबंदी, गस्त वाढविण्याचे आदेश एलसीबीसह स्थानिक पोलिसांना दिले होते. दरम्यान एका कार्यालयात मोठी रोकड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने नगर शहरातील  मार्केट यार्ड परिसरात काल सायंकाळी छापेमारी करून ७२ लाखांची रोकड ताब्यात घेतली.

याप्रकरणी चेतन पटेल व आशिष पटेल वा दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी एवढी मोठी रोकड नगर शहरात कशासाठी आणली होती. याबाबतची चौकशी त्यांच्याकडे सुरू असून नगर शहरात मोठ्या प्रमाणात हवाल्याचा धंदा सुरू असून ऐन निवडणुकीच्या काळात हवाल्याची रोकड पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...