spot_img
अहमदनगरAhmednagar News : उसने दिलेले पैसे मागितले म्हणून बेदम मारले, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News : उसने दिलेले पैसे मागितले म्हणून बेदम मारले, अहमदनगरमधील घटना

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून तिघांनी तरूणाला मारहाण केली. किरण बाबाजी जाधव (वय 32 रा. पिंपळगाव वाघा ता. नगर) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काशिनाथ बन्सी गुंजाळ, संदीप भाऊसाहेब जासुद, नितीन काशिनाथ गुंजाळ (सर्व रा. दैठणे गुंजाळ ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना रविवारी (दि. 4) दुपारी तीनच्या सुमारास पिंपळगाव वाघा शिवारात घडली असून बुधवारी (दि.7) सायंकाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

किरण जाधव यांनी हात उसणे दिलेले पैसे मागितले असता तिघे किरण यांच्या घरासमोर आले. काशिनाथ याने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संदीप याने लोखंडी गजाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. नितीन याने काठीने मारहाण करून शिवीगाळ केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जखमी किरण यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार एम.एस.खरमाळे तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...