spot_img
देशBreaking : कारभार आटोपला, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्ष...

Breaking : कारभार आटोपला, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्ष तुरुंगवास

spot_img

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा कारभार आता आटोपला आहे. सायफर प्रकरणात इमरान खान यांना 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांचे सहकारी, माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली.

गोपनीय डिप्लोमॅटिक केबल्स (सायफर) लीक करणे आणि गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने आरोप केला आहे की, दस्तऐवजात अमेरिकेने इम्रान खान यांना पदावरून हटवण्याची धमकी दिली होती.

इम्रान खान यांना ५ ऑगस्टला तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने २९ ऑगस्टला त्यांची शिक्षा स्थगित केली होती, परंतु Cipher प्रकरणात न्यायालयीन कोठडी असल्यामुळे ते तुरुंगातच होते.

यादरम्यान, ३० सप्टेंबर रोजी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये कुरेशी यांचे सायफर प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...