spot_img
महाराष्ट्रManoj Jarange Maratha Andolan : समाजासाठी 2011 पासून आंदोलने, संघर्ष..जमीनही विकली होती..अखेर...

Manoj Jarange Maratha Andolan : समाजासाठी 2011 पासून आंदोलने, संघर्ष..जमीनही विकली होती..अखेर 2024 मध्ये यश ! मनोज जरांगेंचा 14 वर्षांचा वनवास संपला

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात लढ्याला यश आले. शासनाने मनोज जरांगें यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. (Manoj Jarange Maratha Andolan) त्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की, मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी तब्बल 2011 पासून लढा सुरु केलेला आहे. आता त्यांचा आंदोलनाचा 14 वर्षांचा वनवास संपला. समाजातील सर्वसामान्य व्यक्ती ते मराठा आरक्षणाचे नेते असा मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास संघर्षमय होता.

  2011 पासून आंदोलनास सुरुवात
मनोज जरांगे पाटील यांनी 2011 पासून मराठा समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली. आरक्षणाच्या चळवळीत ते 2011 मध्ये सक्रिय झाले. अवघ्या तीन वर्षांत ते आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करु लागले. त्यांनी 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा लक्षवेधक ठरला. त्यानंतर 2015 ते 2024 या काळात त्यांनी 30 हून अधिक आंदोलने केली.

  समाजाच्या विविध प्रश्नांसाठी जमीन विकली
मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील मोतोरी या गावातील रहिवाशी आहेत. त्यांनी बीडमधून जालनाकडे आपला मुक्कम हलवला. त्यांच्या घराची परिस्थिती सामान्य होती. यामुळे उपजिविकेसाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम सुरु केले. परंतु समाजासाठी काम करायचे त्यांनी ठरवले आणि कुटुंबकडे दुर्लक्ष करत मराठा आंदोलनात सहभागी झाले. मराठा आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च्या जमीन विकली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढले. आमरण उपोषणे केली. रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण मराठवाड्यात पसरले.

लाठीचार्जनंतर राज्याचे लक्ष वेधले
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 पासून आरक्षणासाठी उपोषण सुरु केले होते. 1 सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. यावेळी प्रचंड गोंधळ झाला. पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लागले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती ; शिक्षक नेते संजय धामणे यांचे संचालक मंडळावर गंभीर आरोप

अहमदनगर / नगर सह्याद्री - प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती, सॉफ्टवेअर खरेदीसह जाहिराती व संचालक...

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....