आळंदी। नगर सहयाद्री
आळंदीच्या एक वारकरी शिक्षण संस्थामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. संस्थेच्या संस्थाचालकानं संस्थेतील तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दासोपंत उंडाळकर (वय- ५२)या असे संस्थाचालकाचे नाव आहे.
आळंदीत वारकरी शिक्षण संस्था महाराष्ट्र्भर प्रचलित आहे. अनेक विध्यार्थी वारकरी शिक्षण घेण्यासाठी येथे येत असतात. येथेच राहण्याची व भोजनाची व्यवस्था केलेली असते. याचं शिक्षण संस्थेत दासोपंत उंडाळकर शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
दासोपंत उंडाळकर गेल्या पंधरा दिवसांपासून अल्पवयीन मुलांना एकांतात बोलावून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होते. पीडित मुलांनी त्यांच्या पालकांना ही बाब सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.