spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी : पार्थ पवारांनी घेतली मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणेची भेट,...

मोठी बातमी : पार्थ पवारांनी घेतली मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणेची भेट, कशासाठी? पहा..

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारीला हत्या झाल्यानंतर हा विषया सर्वत्र चर्चिला जात असताना आता मारणे टोळीचा म्होरक्या गजा उर्फ गजानन मारणे आता चर्चेत आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गजानन मारणे याची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. पार्थ पवार आणि गजा मारणे यांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

गजानन मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. गजा मारणे त्याची पत्नी आणि पार्थ पवार यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे भेट घेतली याबाबतत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूीवर भेट घेतली असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. या भेटीवेळी शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते.

गजानन मारणे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून मारणे टोळीच गजा मारणे मुख्य म्होरक्या आहे. गजानन मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. पुण्यात निलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यातील टोळीयुद्ध पुण्याला माहिती आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्येस गजा मारणेला अटक झाली होती. तीन वर्ष तो येरवड्यामध्ये होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा असून दोन्ही टोळ्यांचे म्होरके शरद मोहोळ आणि गजानन मारणे यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...